शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

यू-ट्यूबर 'गँगनम स्टाईल'चा विक्रम!

WD
ट्वेंटी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकल्यानंतर वेस्ट इंडीजच्य क्रिकेटपटूंनी गँगनम स्टाईलमध्ये केलेला जल्लोष सगळ्यांना आठवत असेलत. ख्रिस गेल आणि कंपनीच्या 'त्या' जल्लोषानंतर भारतात गँगनम स्टाईल प्रचंड लोकप्रिय झाली होती.

याची चर्चा पुन्हा एकदा करण्याचे कारण म्हणजे, दक्षिण कोरियाचा 'पॉप स्टार' साय याचा 'गँगनम स्टाईल' हा व्हिडिओ 'यू-ट्यूब'वरील सर्वात जास्त वेळा पाहिला गेलेला व्हिडिओ ठरला आहे.

गँगनम स्टाईलने हा टप्पा गाठला. आतापर्यंत यू-ट्यूबवर गँगनम स्टाईलचा अधिकृत व्हिडिओ 80 कोटी वेळा पाहिला गेला आहे. याआधी कॅनडाचा गायक जस्टीन बिबर याचा 'बेबी' हा व्हिडिओ 'यू-ट्यूब'वर सर्वाधिक हिट ठरला होता.

जुलैमध्ये गँगनम स्टाईल प्रदर्शित झाल्यानंतर 34 वर्षीय साय लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला.

बिबरच्या 'बेबी' या व्हिडिओला 80 कोटी 30 लाख 'व्ह्यूज' आहेत, तर गँगनम स्टाईलचे व्ह्यूज शनिवारी 80 कोटी 50 लाखांपर्यंत गेले. आतापर्यंत कधीही एखाद्या व्हिडिओला इतके या मिळालेले नाही. रोज किमान सात ते आठ लाख वेळा 'गँगनम स्टाईल' पाहिला जात आहे, असे यू-ट्यूबने सांगितले.