शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

लंडन ते इटली प्रवास पासपोर्ट-तिकिटाविना

WD
एका देशातून दुसर्‍या देशात जाण्यासाठी 'पासपोर्ट'ची आवश्यकता असते, त्याचबरोबर विमान प्रवासासाठी तिकीट आणि 'बोर्डिंग पास'ची ही गरज असते, मात्र पासपोर्ट-तिकीट नसतानाही येथी एका 11 वर्षे वयाच्या मुलाने लंडन ते इटली असा प्रवास पूर्ण केला आहे.

लंडनमध्ये ऑलिम्पिक सर्प्धेनिमित्त कडेकोट बंदोबस्त आह, मात्र या मुलाकडे पासपोर्ट व तिकीट नसतानाही त्याने विमानामधून प्रवास कसा केला, याचा सध्या तपास सुरू आहे. मँचेस्टर एअरपोर्टच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर कडेकोट बंदोबस्त असतानाही हा मुलगा येथून विमानात बसून इटलीमध्ये कसा गेला, याची चौकशी सुरू आहे. या घटनेला किती महत्त्व द्यायचे, हा प्रश्न असला तरी, दोषी असणार्‍यांवर करावाई केली जाईल.