शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

लक्ष्मी मित्तल यांना फ्रान्सबाहेर काढण्याची मंत्र्याची मागणी

WD
आर्थिक संकटात सापडलेले युरोपियन देश एकीकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करीत आहेत, तर दुसरीकडे भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांना लाथ मारून हाकलून द्या, अशी मागणी फ्रान्सच्या एका मंत्र्याने केली आहे. लक्ष्मी मित्तल हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 21व्या स्थानी आहेत.

पोलाद उद्योगात मित्तल यांनी साम्राज्य उभे केले आहे. फ्रान्स सरकारला त्यांची गुंतवणूक नको आहे. स्वत:च्या उद्योगाला पायदा‍ मिळावा, यासाठी सरकारशी खोटे बोलले असल्याचा मित्तल यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.