गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वार्ता|

सर्कोजींच्या प्रेमिकेला पाहायचाय ताजमहाल....

फ्रान्सचे राष्ट्रपती निकोलस सरकोजी यांच्या नव्या प्रेमिकेला, प्रेमाचे प्रतीक असलेला ताजमहाल पाहण्याची मोठी उत्सुकता लागली आहे.
पुढच्या आठवड्यात गणतंत्र दिवसाला प्रमुख अतिथी म्हणून सर्कोजीं भारत दौर्‍यावर येत असून, त्यांच्या सोबत त्यांची प्रेमिका कार्ला बुनी याही येत आहेत .'द टेलीग्राफ' ने या वृत्ताचा खुलासा केला आहे.

भारत सरकारने, फ्रान्स सरकारकडे कार्ला यांच्या दौर्‍याविषयीची आधीकृत माहिती मागितली असून, त्यानुसार त्यांना सरकारी दर्जा मिळणार आहे.दरम्यान राष्ट्रपती सर्कोजी या दोन दिवसात भारतीय मंत्र्यांसोबत बैठकांमध्ये व्यस्त असतील तर कार्ला यांना एकटेच ताजमहाल
पाहण्यासाठी जावे लागण्याची शक्यता आहे.