गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

सुनिता विल्यम्सची पुन्हा अंतराळ वारी

भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनिता विल्यम्सने आपल्या दोन सहयोग्यांसोबत रविवार सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी रशियन अंतराळयानाने अवकाशात झेप घेतली.

PTI
PTI
सुनिताचे वडिल भारतीय वंशाचे असून आई स्लोवानियन वंशाची आहे. ती दुसर्‍यांदा अंतरिक्ष यात्रेवर जाणार असून याअगोदर २००६ मध्ये ती अंतराळात गेली होती. पहिल्या यात्रेवेळी तिने सहा महिने अंतराळात घालविले होते.

बाकोनुरहून रवाना होणार्‍या अंतरिक्ष यानात सुनीतासोबत रशियन अंतराळ संस्थेचे फ्लाइट इंजीनियर यूरी मालेनशेनको आणि जापान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन संस्थेचे आकिहितो होशिदे, ही दोघे आहेत. एक्सपीडीशन-३२ ची फ्लाईट इंजिनिअरची जबाबदारी ती सांभाळत आहे. (वृत्तसंस्था)