शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

स्पेनची मिरिया लालगुना मिस वर्ल्ड

यंदाच्या मिस वर्ल्ड किताबाच्या स्पर्धेत स्पेनच्या मिरिया लालगुना हिने बाजी मारली. मिस रशिया या स्पर्धेत दुसऱ्या तर तिसऱ्या क्रमांकावर मिस इंडोनिशिया आहे. दक्षिण चीनमधील हैनान प्रांतात शनिवारी रात्री ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व अदिती आर्या करत होती. परंतु तिला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आले नाही. मिस इंडिया अदिती ६५व्या क्रमांकावर राहिली.या स्पर्धेत जगभरातल्या ११४ सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. 
 
मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी २३ वर्षीय रोयो स्पेन येथील बार्सिलोनाची रहिवाशी आहे. रोयो एक मॉडेलही आहे. मिस या निवडीनंतर मिरिया म्हणाली, की सर्व नागरिकांकडून मला मोठा पाठिंबा मिळाला. याचमुळे मी हा किताब जिंकू शकले. मी खूप आनंदी आहे.