गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016 (16:15 IST)

‘मॅथ्यू’ वादळात 339 जणांचा मृत्यू, अनेक लोक बेघर

अमेरिकेत गेल्या दशकातील सर्वात शक्तिशाली समुद्री वादळ ‘मॅथ्यू’ने हैती भागाला झोडपून काढले आहे. त्यामुळे दक्षिण भागात मोठी हानी झाली. या वादळात 339 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक बेघर झाले आहेत. या वादळानंतर अमेरिकेतील फ्लोरिडासह जॉर्जियामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अमेरिकेतील जवळपास विमानाची 100 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या शक्तिशाली वादळानंतर जवळपासच्या शहरातील अधिकारी आणि कर्मचारी बचावासाठी येत आहेत. या वादळानंतर संयुक्त राष्ट्र, सरकार आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीज्च्या लोकप्रतिनिधींसह इतर आपातकालीन कर्मचाऱयांसोबत बैठक घेण्यात आली.