शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

धोनीचे पुढचे मिशन 'हैदराबादचा पराभव'

WD
गुरुवार 25 एप्रिल रोजी चिदंबरम स्टेडिमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराझर्स हैदराबाद या दोन संघात सहाव्या आपीएलमधील ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे.

चेन्नईची स्थिती ही बर्‍ापैकी असून हा संघ साखळी गुणतक्त्यात दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. ड्वेन ब्राव्होने राजस्थान रॉयल्सविरुध्द जास्त धावसंख्येच्या सामन्यात शेवटच्या षटकात 11 धावा घेऊन चेन्नईला विजयी केले होते. या विजयामुळे चेन्नईचा संघ गुणतक्यात दुसर्‍या स्थानी आला आहे. या विजामुळे चेन्नई खेळाडूंचा उत्साह वाढला आहे. या दोन संघात या हंगामातील पहिलीच लढत खेळली जात आहे.

चेन्नईने सातपैकी 5 विजय मिळविले आहेत तर हैदराबाद संघानेही सातपैकी 5 विज मिळविले आहेत. सनराझर्सचा संघ हा गुणतक्त्यामध्ये तिसर्‍या स्थानावरील संघ आहे. उपांत्यफेरी गाठण्यासाठी दोन्ही संघाला विजाचा क्रम पुढे चालूच ठेवावा लागणार आहे. चेन्नईची फलंदाजी मजबूत आहे. आंतररांष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला माईक हसी हा चेन्नईचा आधारस्तंभ, असा फलंदाज आहे. याशिवा सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, मुरली विजय, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस मॉरीस असे खेळाडू चेन्नई संघात आहेत. कोणता तरी फलंदाज खेळून जातो व चेन्नई संघ विजयी होतो.

याउलट हैदराबाद संघामध्येसुध्दा लढवय्या खेळाडू आहेत. त्यामुळे दोन्ही संघ सामना जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतील यात शंका नाही. चेन्नईला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होईल. हैदराबाद संघसुध्दा विजासाठी आसुसलेला आहे.

प्रतिस्पर्धी संघ :

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुरली विजय, माईक हसी, ड्वेन ब्राव्हो, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शादाब जकाती, डर्क नॅनेस, जेसॉन होल्डर, श्रीकांत अनिरुद्ध, सुब्रम्रण्यम,बद्रीनाथ, फाफ डु प्लेसीस, बेन हिलफेनहस, अल्बी मोरकेल, ख्रिस मॉरिस, मोहित शर्मा.

सनराझर्स हैदराबाद- कुमार संगाकारा (कर्णधार), अक्षत रेड्डी, अमित मिश्रा, अंकित शर्मा, आशिष रेड्डी, बिपलब समंतराय, कॅमरून व्हाईट, डेल स्टेन, डॅरेन सॅमी, हनुमा विहारी, इशांत शर्मा, नथन मुकुलूम, पार्थिव पटेल, क्विंटॉन डी नॉक, सचिन राणा, शिखर धवन, सुदीप त्यागी, थिसारा परेरा.