शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. आयटीच्या जगात
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2009 (19:48 IST)

'डूडल' स्पर्धेत नाशिकची रिया जाधव तिसरी

PR
PR
गुगलने जाहिर केलेल्या 'डूडल' स्पर्धेत पुरू प्रताप सिंह या गुडगाव (दिल्ली) येथील चौथीत शिकणार्‍या मुलाचे डूडल चार हजार प्रवेशिकांमधून पहिला क्रमांक प्राप्त करणारे ठरले आहे. भोपाळच्या हदिय्या आफ्रिदी या पहिलीतील मुलीचा दुसरा तर नाशिकच्या रिया जाधव या सातवीतील मुलीचा तिसरा क्रमांक आला आहे.

डूडल म्हणजे एखाद्या विशिष्ट दिवसासाठी गुगलने बनविलेला खास लोगो. विशिष्ट चमत्कृती (रचना, शाब्दिक) करून त्या दिवसांचे महत्त्व गुगल या नावातून अधोरेखित व्हावे असा या मागचा हेतू आहे. गुगलच्या डेनिस व्हॅंग याने डूडल ही संकल्पना आणली. ती खूपच लोकप्रिय झाली. त्यातूनच मग ऑगस्टमद्ये भारतात 'डूडल फॉर गुगल' ही स्पर्धा घेण्यात आली. पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांसाठी ही स्पर्धा खुली होती.

त्यासाठी प्रख्यात कार्टुनिस्ट एन. पोन्नप्पा, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत के. के. राघव आणि अहमदाबादच्या नॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या प्राध्यापकांचा परिक्षकांमध्ये समावेश होता.

या स्पर्धेत चौथीत शिकणार्‍या पुरू प्रताप सिंग या दिल्लीतील मुलाचे डूडल पहिल्या क्रमांकाने निवडण्यात आले. गुगल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश राव यांनी आज याची घोषणा केली. पुरूचे डूडल माय इंडिया या थीमवर आधारीत असून ते १४ नोव्हेंबरला गुगलच्या होमपेजवर दिसेल. याशिवाय त्याला गुगलतर्फे लॅपटॉप आणि एक टिशर्ट मिळले. शिवाय त्याच्या शाळेला एक लाख रूपयाचे तांत्रिक सहाय्यही मिळेल. याशिवाय या स्पर्धेतील उपविजेत्यांना प्रमाणपत्र आणि गुगल गुडी बॅग मिळणार आहे.

पहिले तीन विजेते असे-
पुरू प्रताप सिंह - गुडगाव (दिल्ली) (चौथी ते सहावी)
हदिय्या आफ्रिदी (पहिली)- भोपाळ- (पहिली ते तिसरी)
रिया जाधव (आठवी)- नाशिक - (सातवी ते दहावी)