शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. आयटीच्या जगात
Written By वेबदुनिया|

काळासोबत बदलती व्हिडिओ गेम्सची दुनिया

ND
ND
ऑनलाइन किंवा व्हिडिओ गेम्सना नेहमी कसल्यातरी आजारासाठी जबाबदार ठरवण्यात येते. यामुळे वैचारिक असंतुलनापासून हिंसक वृत्तीत वाढ होते, असे कानावर पडत असते. यासारख्या खेळांच्या आहारी गेलेल्यांमध्ये लठ्ठपणाचा प्रकारही आढळतो.

वेळेसोबत सर्वच गोष्टीत बदल होतात. व्हिडिओ गेम्सच्या दुनियाही आता चांगलीच बदलली आहे. आतापर्यंत सोफ्यावर आरामात लोळत हे गेम्स खेळण्यात येत असल्याने लठ्ठपणाचे कारण बनले होते. या समस्या दूर करून गेम्सना आनंददायक अनुभव बनवण्यासाठी गेमिंग कंसोल कंपनी नवीन एक्शन गेमिंग कंसोल बाजारात आणत आहेत. निंटेडो कंपनीने यावर उपाय शोधला असून यामुळे गेम्स खेळताना शारीरिक व्यायामही चांगल्या प्रकारे होतो.

ND
ND
रेस पासून फाइट सुद्धा खरीखुर
एक्शन गेमिंग कंसोलचे गेम्स खेळताना आपण आता धावण्यापासून इतर शारीरिक हालचालीही करू शकता. कोणती हालचाल केल्याशिवाय हे खेळ खेळणे शक्यच नाही. या खेळांमध्ये विशेष जॉयस्टिक बसवण्यात आली असून यामध्ये हालचाल करूनच विजय नोंदवणे शक्य आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात याप्रकारचे खेळ खेळणे हितकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऑनलाइन गेमिंगचे की-पॅडचे बटन्स विनाकारण दाबल्याने वेळेचा अपव्यय होतो. याप्रकारचे खेळ खेळल्याने व्यक्तिमध्ये समाजाच्या संपर्कात राहण्याची भावना वृद्धीस पावते. कोणत्याही समस्येचे चुटकीसरशी निराकरण करण्याची क्षमता यामुळे विकसित होते.

चुटकीसरशी सोडवू शकता समस्य
या नवीन व्हिडिओ गेम्समुळे टीम वर्क आणि परिस्थितीचा आढावा घेण्याची भावना विकसित होते. या खेळांची तुलना बुद्धीबळाशी करता येईल, कारण दोन्हीत आपण डावपेच आखण्याच्या कलेत निपून होता आणि प्रश्नांना तातडीने सोडवण्याची क्षमता विकसित होते. या गेम्स मध्ये वेगाची आवश्यकता असण्यासोबतच जीवनशैली बदलण्यासाठीही याचा उपयोग होतो. ऑनलाइन गेम्स मध्ये जिंकण्याची ईर्ष्या आपल्या लक्षप्राप्तीसाठी चांगली तयारी करणेही शिकवते. क्रिकेट पासून मिलिटरी वार सारखे गेम्स एक-दुसर्‍याप्रती आपल्या जबाबदारी जाणीव वृद्धिंगत करते.

ND
ND
व्हिडिओ गेम्सचे व्यसन हानिकारक
मनोवैज्ञानिक डॉ. अभय पालीवाल यांच्यामते इतक्यात कित्येक कंपन्यांनी एक्शन गेमिंग कंसोल बाजारात आणले आहेत. अगोदरच्या व्हिडिओ गेम्सपेक्षा ते चांगले आहेत. उपयोगकर्त्यांच्या विचारावर त्याचा नकारात्मक परिणाम होत नाही. प्रत्येक क्षणी धावपळ आणि एक्शनमुळे हे खेळ युवावर्गापासून लहान मुलांपर्यंत सर्वांसाठीच फायद्याचे आहेत.

त्यांच्यामते- या गेम्सच्या चाहत्यांना एकाग्रतेत कमी येण्याच्या समस्येचा सामना करावा लागला नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की आपण फक्त ऑनलाइन खेळच खेळत राहा. एक तासापर्यंत व्हिडिओ गेम्स खेळणे फायद्याचे ठरू शकते, मात्र याचे व्यसन लागु देता कामा नये.