बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 23 एप्रिल 2015 (10:56 IST)

ट्विटरवर आता कुणालाही पाठवा डायरेक्ट मेसेज

ट्विटरने डायरेक्ट मेसेज म्हणजे प्रायव्हेट मेसेज करणं आणखी सोपं केलंय. यापूर्वी तुम्हाला जर एखाद्याला डायरेक्ट मेसेज करायचा असेल तर त्याने तुम्हाला ट्विटरवर फॉलो करणं अनिवार्य होतं. त्याशिवाय त्याच्यापर्यंत डायरेक्ट मेसेज जातच नव्हता. आता ट्विटरने ही अट काढून टाकलीय. म्हणजेच तुम्ही कोणालाही डायरेक्ट मेसेज करू शकता. त्यासाठी तुम्ही कुणाला फॉलो करण्याची आवश्यकता उरणार नाही.

डायरेक्ट मेसेज हा अर्थातच प्रायव्हेट मेसेज असल्यामुळे तो ट्विटर टाइमलाइनवर दिसणार नाही. ट्विटरने आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये डायरेक्ट मेसेजविषयीची तपशीलवार घोषणा केलीय. तसंच ट्विटरवरही हा मेसेज प्रसारित केलाय.

डायरेक्ट मेसेजसाठी एकमेकांनी एकमेकांना फॉलो करण्याची अट काढून टाकल्याने आपल्याला हवा तो मेसेज पोहोचवताही येणार आहे, शिवाय त्या ट्विटर हँडलला फॉलो करण्याची आवश्यकताही उरणार नाही. तसंच जे मेसेज फक्त दोन व्यक्तीसाठीच मर्यादित असतात, त्याचा आपल्याला फॉलो करणार्‍या अन्य व्यक्तीनांही त्रास होणार नाही.

अँड्रॉईड आणि आयफोनच्या ताज्या अपडेटमध्ये प्रोफाइल पेजवरच डायरेक्ट मेसेजचं बटण देण्यात आलं आहे. यापूर्वी ट्विटरने डायरेक्ट मेसेजमध्ये ग्रुप तयार करण्याचं स्वातंर्त्य टि्पल्सना दिलं होतं. कुणाकडूनही डायरेक्ट मेसेज रिसीव्ह करण्याची सुविधा देण्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये तसे बदल करावे लागतील. सध्या काही बिझनेस हाउस आणि बडे ब्रँड आपल्या कस्टमरांना रिस्पॉन्स देणं सोयीच व्हावं, यासाठी कुणाकडूनही डायरेक्ट मेसेज रिसीव्ह करण्याची सुविधा वापरत होते, आता ही सुविधा सर्वसामान्य ट्विटर यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.