शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. आयटीच्या जगात
Written By wd|
Last Modified: लंडन , सोमवार, 28 एप्रिल 2014 (15:24 IST)

पासवर्ड विसरला? नो प्रॉब्लेम!

कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याचे काम अनेकांना त्रासदायकच वाटते. एटीएम कार्डच्या पीनपासून ते स्वतःच्याच मोबाईल नंबरपर्यंतच्या अनेक गोष्टीही लक्षात ठेवणे अनेकांना जमत नाही. अशा वेळी कॉम्प्युटरला आपणच दिलेला पासवर्डही अनेकांना लक्षात राहत नाही. अशातच वेळोवेळी पासवर्ड बदलणे ही इंटरनेट युजर्ससाठी एक समस्याच आहे. मात्र, आता काळजी करण्याची गरज नाही. आता युजर्स व्हिजुअल डिजाईनचा पासवर्ड वापरू शकतात. एवढेच नाही तर आता तुम्ही टच पासवर्ड म्हणजेच शारीरिक अवयवांचाही पासवर्ड ठेवू शकतात. हॅनोवरमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या टेक्निकल फेयर सिबिटमध्ये या तंत्राचा शोध लावणार्‍या 'विंफ्रासॉफ्ट'ने याचे सादरीकरण केले. डेव्हलपर्सच्या मते स्मार्टफोनच्या या युगात डझनभर पासवर्ड लक्षात ठेवणे म्हणजे डोकेदुखीच आहे. 

ब्रिटनच्या सॉफ्टवेअर आणि उपकरणे तयार करण्यार्‍या विंफ्रासोफ्ट कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर स्टिवन होपच्या मते जास्त पासवर्ड हे विक असतात, त्यामुळे ते सहज हॅक होतात. युजर्सच्या दृष्टिकोनातून हे पासवर्ड कठीण असतात. कारण त्यांना 20-30 पासवर्ड लक्षात ठेवावे लागतात त्यामुळे युजर्सना ते कठीण वाटते. अनेक लोक पासवर्ड तयार करताना जास्त विचार न करता '12345' किंवा password'हे पासवर्ड वापरतात. असे सिबिटचे प्रवक्ता हार्टविग वोन सैसने सांगितले. हार्ड विगच्या मते असे पासवर्ड सहज हॅक होतात. युजर्सची हीच अडचण लक्षात घेऊन विंफ्रासॉफ्टने चार रंगाच्या ग्रिडचा पासवर्ड तयार केला आहे.