शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

मार्क झुकरबर्गच्या मुलीला चिनी नाव!

चिनी नूतन वर्षाच्या निमित्ताने फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने आपल्या मुलीला चिनी नाव प्रदान केलं आहे. मार्क आणि त्याची पत्नी प्रिसिला चान यांनी त्यांची लेक मॅक्सचं ‘चेन मिन्ग्यु’ असं नामकरण केलं आहे. 
 
मार्कने पत्नी आणि मुलीसह एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करत याबाबत घोषणा केली. प्रिसिलाच्या माहेरच्या आडनावावरून ‘चेन’, तर ‘मिन्ग्यू’ म्हणजे जगाच्या आशादायी भवितव्यासाठी आम्ही तिचं चिनी भाषेत नामकरण केलं आहे, असं मार्क सांगतो. मिंगचा अर्थ उज्ज्वल तर यू म्हणजे विश्व.
 
‘चिनी नावं बहुतेक वेळा प्रतिकात्मक असतात. आपल्या बाळाच्या आयुष्यात नावाचं मोठं योगदान असल्यामुळे पालक त्याबाबत आग्रही असतात.’ असं झुकरबर्ग सांगतो. गेल्या वर्षी मार्क आणि प्रिसिलाच्या आयुष्यात मॅक्सचं आगमन झालं. पॅटर्नल लीव्हवर गेलेला मार्क काहीच दिवसांपूर्वी पुन्हा कामावर रुजू झाला.