पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून लालकृष्ण अडवाणी यांचे नाव जाहीर केले ही सर्वांत मोठी चूक होती. रालोआच्या पराभवामागे मुख्य कारण अडवाणीच ठरले अशी प्रतिक्रिया पक्षाचे निर्विवाद वर्चस्व अछत्तीसगढमधील भाजपच्या एका नवनिर्वाचित खासदाराने दिली आहे.
छत्तीसगढच्या बस्तर लोकसभा मतदार संघातून सलग चवथ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकणारे भारतीय जनता पक्षाचे बलराम कश्यप यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले, की देशातील जनतेने अडवाणी यांना पंतप्रधान म्हणून न स्वीकारल्याने आघाडीचा पराभव झाला.