शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2020 (11:33 IST)

टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त धोका: रिसर्च

टक्कल असलेल्या पुरुषांना इतरांपेक्षा कोरोनाव्हायरस संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. 
 
अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीत केलेल्या या अभ्यासाचे प्रमुख संशोधक प्रोफेसर कार्लोस वॅम्बीयर यांच्यानुसार पुरुषांमधील टक्कल हे COVID-19 च्या गंभीर संसर्गासाठी धोकादायक घटक आहे. 
 
माहितीनुसार कोरोना विषाणू आणि टक्कल पडण्यातील संबंध समजून घेण्यासाठी दोन रिसर्च करण्यात आल्या. स्पेनमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, 41 कोरोना रूग्णांवरील संशोधनात असे दिसून आलं आहे की त्यापैकी 71 टक्क्यांहून अधिक पुरुषांना टक्कल होते. ब्राउन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, 122 कोरोना रूग्णांवर संशोधन केलं गेलं होतं, त्यातील 79 टक्के रुग्णांना टक्कल असल्याचे कळून आले.
 
दोन्ही अभ्यासातून केला दावा
संशोधकांच्या मते पुरुषांच्या सेक्स हार्मोन एंड्रोजनमुळे कोरोना विषाणूची लागण होण्याची क्षमता वाढू शकते. अशा हार्मोनमुळे पुरुषांमध्ये औषधांचा प्रभाव कमी होत आहे आणि रुग्ण गंभीर आजारी पडतात. शोधकर्त्यांप्रमाणे एंड्रोजन हार्मोन कोरोनाच्या सेल्सला संक्रमित करण्याचं गेटवे होऊ शकतं. इतर शोधकर्त्यांप्रमाणे यावर अधिक संशोधनाची गरज आहे ज्याने नवीन माहीती समोर येऊ शकते.
 
करोना बाधित पुरुषांची संख्या अधिक 
याआधी करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे म्हटले गेले आहे की पुरुषांच्या रक्तात अशा रेणूंची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे, जी सहजपणे कोरोना विषाणूचे वाहक बनतात. संक्रमित पुरुष आणि स्त्रिया वय आणि संख्या एकसारखीच होती परंतु पुरुषांना अधिक गंभीर आजार होते. शास्त्रज्ञांना असेही आढळले की मृत्यू झालेल्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक पुरुष होते, म्हणजेच पुरुषांचा मृत्यू दर स्त्रियांपेक्षा 2.5 पट इतका असू शकतो.
 
या व्यतिरिक्त पुरुषांची इम्युनिटी स्त्रियांच्या तुलनेत कमकुवत असणे, पुरुषांमध्ये स्मोकिंगची सवय, त्यांची लाइफस्टाइल आणि हायजीन हे देखील पुरुषांना या संसर्गाचा अधिक धोका असल्याची कारणे आहेत.