बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By एएनआय|

गोव्यातील मान्सूनोत्सवः 'सॅन जोआओ'

उन्हाळ्याचा प्रचंड उकाडा संपल्यानंतर मॉन्सूनच्या आगमनाने सृष्टी चैतन्याने न्हाऊन निघते. अशावेळी गोव्यातील वातावरण काही वेगळेच असते. लाटांवर स्वार होवून वाहणारा तेथील थंड वारा आपल्याला साद घालत असतो. सर्व वातावरण चैतन्याने भारलेले असते. सृष्टीला हे रूप बहाल करणाऱ्या मॉन्सूनप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यासाठी 'सॅन जोआओ' हा उत्सव साजरा करण्यात आला. हा उत्सव नुकताच गोव्यात उत्साहात साजरा झाला. पोर्तूगीजांपासून गोव्यात हा सणं दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सावादरम्यान लोक नदी व तलावांमध्ये मनसोक्त पोहून मॉन्सूनचे स्वागत करतात.

गोव्यातील गावांमध्ये हा उत्सव अधिक पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. दक्षिण गोव्यातील लोटूलिम गावात लोक गवत व फूलांपासून बनवलेला मुकूट धारण करून संगीताच्या तालावर नृत्यविष्कारात रंगून जातात. नृत्य आटोपल्यावर नदी व तलावात पोहणे आलेच. मेंड्रा अलवेयर्स सांगतात, '' सॅन जोआओ आनंद व उत्साहाचा सण आहे''. संत जॉनच्या आठवणीतही हा उत्सव साजरा करण्यात येत असल्याचे मानण्यात येते.

पारंपारिक मुकूट घालून संगीताच्या तालांवर नाचण्यासोबतच पारंपारिक पक्वान्नांचाही आस्वाद घेण्यात येतो. येथील नवेलिम गावांत उत्सव साजरा करण्याची तर्‍हा निराळीच आहे. गावांतील तरूण यादिवशी विहींरीमध्ये डुंबण्याचा आनंद घेतात. कुटूंबातील सर्व सदस्य फुलांचा मुकूट घालून पारंपारिक नृत्य व संगीतात मान्सूनचे स्वागत करतात. मॉन्सूनचे स्वागत करण्याची गोव्यातील परंपरा एकमेवाद्वितीय आहे एवढे निश्चित.