शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

नांगरतास धबधबा

WD
बेफाम निघालेला पाण्याचा प्रवाह महाकाय पर्वतालाही कसा कापू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हण जे नांगरतास धबधबा. सुमारे 200 फूट खोल पडणारे पाणी वरून पाहता येते पाण्याच्या प्रवाहाने इथला डोंगर अक्षरश: कापला गेला आहे.

डोंगराला साधारणत: अडीच फुटाची भेग पडली आहे. 200 फूट खोल भेगेतून हा प्रवाह पुढे सरकतो व डोंगरखाली उतरतो. जेवढे सुंदर तेवढेच भीतीदायक असलेले हे ठिकाण आंबोलीपासून 10 कि. मी. वर आहे. याच ठिकाणी आंबोली घाटाचा शोधकर्ता असलेल्या धनगराचे छोटे मंदिर आहे. इंग्रजांना घाटमार्ग काढण्यासाठी ‍‍दिशा दाखवणार्‍या या धनगराचा काम होताच इंग्रजांनीच खून केला ते नांगरतास हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण आहे.