मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

मनचे धबधबा

WD
कदेवगड तालुक्यातील मनचे धबधबा हे क्षे‍त्र जेवढे सुंदर तेवढेच धार्मिकदृष्टाही महत्त्वाचे आहे. गावातील गर्द वनराईतील दोन डोंगरांच्या मधून वाहणार्‍या या धबधब्याशेजारी श्री देव व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे. 200 पूट उंचीचा हा धबधबा पाहताना सभोवतालची शांत वनराई आणि धबधब्याच्या दगडाला आपटून फुटणार्‍या पाण्याच्या धारांचे संगीत मन प्रसन्न करते.

तरळेहून सुमारे 30 कि.मी. अंतर कापून मनचे गावात गेल्यावर पायवाटेने 2 कि.मी. चालत गेल्यानंतर या प्रेक्षणीय धबधब्याचे दर्शन घडते. तरळेहून एसटीनेही येथे पोहोचता येते.