शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By सॉ. अर्चना गजेंद्र भटूरकर|

सिंधुदुर्ग

सागरी साम्राज्याच्या विस्तारासाठी शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये सिंधुदूर्ग किल्ला बांधला. पश्चिम महाराष्ट्रात मालवणजवळ हा जलदुर्ग आहे. अठ्ठेचाळीस एकर बेटावर वसलेला हा दुर्ग बांधण्यासाठी तीन वर्षे सहा हजारहून जास्त कामगार दिवसरात्र मेहनत करत होते.

या गडाची तटबंदीची भिंत 30 फूट उंच व 12 फुट रूंद आहे. भिंतीची लांबी दोन मैल आहे. या ‍गडाला पन्नासहून अधिक बुरूज आहेत. बुरूजांवर अजूनही काही तोफा ठेवलेल्या आहेत.

याचे प्रवेशव्दार अशाप्रकारे बांधण्यात आले आहे की त्याच्यावर समोरून तोफांचा मारा करता येणार नाही. आतमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती आहे.