पावसाळी पर्यटनासाठी दूरशेत

doorshet
Last Modified मंगळवार, 2 ऑगस्ट 2016 (15:58 IST)
वर्षा ऋतु आला म्हणजे निसर्गप्रेमींची मज्जाच. जसे रात्री चांदण्या व चंद्र आपल्या प्रकाशाने आकाशाची सुंदरता वाढवतात तसेच वर्षा ऋतु निसर्गाची सुंदरता वाढवतो. अशा या वर्षा ऋतुचा आनंद घेण्यासाठी निसर्गाचे एक सुंदर उदाहरण म्हणजे आंबा नदीच्या काठावर आणि सह्याद्री पर्वताच्या अंतर्गत असलेले रायगड जिल्ह्यातील दूरशेत (ता.खालापूर) हे गाव. हे गाव मोठ मोठ्या डोंगर व दऱ्यांमुळे पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते. तसेच महाराष्ट्रातील अनेक ट्रेकिंग ठिकाणांमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैली पासून दूर जाऊन निसर्गाला जवळून पाहण्याचे हे एक सुंदर ठिकाण आहे.
दूरशेत हे गाव पाली आणि महाडच्या दोन गणेश मंदिरांदरम्यान आहे. सन १६०० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्तलाब खान यांच्यामध्ये उंबरखिंडसाठी लढाई झाली होती. त्यामुळे हे एक ऐतिहासिक स्थळ म्हणूनही ओळखले जाते.

जाण्याचा मार्ग : दूरशेत मुंबई व पुण्यापासून जवळ असल्यामुळे तेथे पोहोचण्याचा मार्ग सोपा आहे. मुंबई/पुणेकडून खोपोली येथे जावे. खोपोलीहून टॅक्सी वा रिक्षा करून दूरशेतला पोहचता येते. तेथे जाण्यासाठी सहज वाहतुकीची सोय उपलब्ध आहे. खोपोली रेल्वे स्टेशन हे दूरशेतहून १५ किमीच्या अंतरावर आहे. मुंबईहून खोपोलीसाठी दररोज लोकलही जाते.

पाहण्याची ठिकाणे : दूरशेतमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पाली गणेश मंदिर आणि महड गणेश मंदिर दूरशेतच्या जवळपास आहे. येथे भाविकांची गर्दी असते. तसेच तेथून थोड्या अंतरावर पाली किल्लाही पाहता येतो. हा किल्ला शिवकालीन आहे. या ऐतिहासिक महत्त्वाशिवाय हा किल्ला ट्रेकर्स आणि साहसी, उत्साही लोकांमध्येही लोकप्रिय आहे. दूरशेत जवळ कुंडलिका नदी आहे, रॅपलिंग, रिवर राफ्टींग, रिवर क्रॉसिंग, इत्यादीचा आनंद घेता येतो. या सोबतच वन्य जीव प्राण्यांचं दर्शन घेण्यासाठी तेथे रात्रीची सफारी करणे गरजेचेच आहे.

राहण्याची सोय : जवळचे पर्यटन स्थळ म्हणून येथे शनिवार आणि रविवारी मुंबई/पुणे हून पर्यटक येत असतात. त्यामुळे त्यांच्या राहण्यासाठी येथे सोय उपलब्ध आहे. येथे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ लोकप्रिय आहेत. मसालेदार करी आणि फ्राईस तर विशेष लोकप्रिय आहे. बटाटा, मटार आणि इतर कडधान्यांपासून बनवलेला मसालेदार मिसळचा रस्सा हा तोंडाला पाणी आणणारा असतो. असे विविध प्रकारचे चवदार पदार्थ येथे खायला मिळतील.

तर, चला, एकदा तरी दूरशेतला अवश्य भेट द्या !

- जस्मीन तांबोळी,


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार
कोरोनामुळेअनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. हॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा परिणाम झाला आहे. ...

कनिका कपूर करोनामुक्त

कनिका कपूर करोनामुक्त
गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा सहावा रिपोर्ट ...

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत
करोनाविरोधातील लढाईसाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुढे आले आहेत. ...

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ ...