थेऊरचा श्री चिंतामणी

Theur
Last Modified सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (15:19 IST)
अष्टविनायकाच्या चिंतामणी मंदिरात भाविकांना शांती मिळते
चिंतामणी (थेऊर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे.

पौराणिक कथा
राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्‍न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्‍न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्‍न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्‍न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.
chintamani Theur
मंदिर
श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.

थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. येथील विनायकाची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची आहे. तसेच, डोळ्यात माणिकरत्न आहेत.
chintamani Theur
गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले. १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रूपये लागले होते. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या २७व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्‍नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

'एक थी बेगम २' ३० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर

'एक थी बेगम २' ३० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर
प्रेम तुम्हाला अनपेक्षित गोष्टी करण्यास भाग पाडते. परंतु सूडबुद्धीची आग तुम्हाला अशा काही ...

राज बाहेर आल्यानंतर शिल्पाची पोस्ट व्हायरल

राज बाहेर आल्यानंतर शिल्पाची पोस्ट व्हायरल
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी सोमवारी ...

अभिनेत्री ईश्वरी देशपांडेसह मित्राचा गोव्यात मृत्यू

अभिनेत्री ईश्वरी देशपांडेसह मित्राचा गोव्यात मृत्यू
गोव्यातील बागा-कलंगुट येथील एका पुलावरून कार गाडी खाडीत कोसळल्याने पुण्यातील अभिनेत्री ...

64 दिवसांनंतर राज कुंद्राची तुरुंगातून सुटका झाली

64 दिवसांनंतर राज कुंद्राची तुरुंगातून सुटका झाली
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात जामीन ...

झी5 ने आपला आगामी ओरिजनल चित्रपट 'रश्मि रॉकेट'ची केली ...

झी5 ने आपला आगामी ओरिजनल चित्रपट 'रश्मि रॉकेट'ची केली घोषणा; नवे पोस्टर प्रदर्शित!
नेहमीच आपल्या उत्तमोत्तम अदाकारीने प्रेक्षकांना थक्क करणारी, अभिनेत्री तापसी पन्नू 'रश्मी ...