किल्ले पेब
माथेरानसारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या माणसांच्या गर्दीपासून मोकळीक हवी असल्यास निसर्गप्रेमींनी पेबचा किल्ला विसरू नये. एरवीदेखील एका दिवसाच्या ट्रेकसाठी 'पेब' सारखी जवळची आणि निसर्गरम्य जागा शोधून सापडणार नाही. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट ,वरील गुहेची रचना ,गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड 'गोरखगडाशी' साधर्म्य साधतो. मात्र त्यामानाने हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे. इतिहास : या किल्ल्याचे मूळ नाव पेब हे नाव पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पेबचा किल्ला चढताना वाटेत लागणारा धबधबा हे एक मोठे आकर्षण. किल्ल्यावरील गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहे समोरून आपल्याला नवरा-नवरी,भटोबा असे सुळके दिसतात. या गडावर कोणत्याहीऋतूत जाता येते.
पुढे पहा गडावर जाण्याचा वाटा
गडावर जाण्याच्या वाटा :
मध्य रेल्वेने कर्जतमार्गेनेरळ स्टेशनवर उतरल्यावर स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. पेबला जाण्यासाठी नेरळ स्टेशनला उतरावे आणि उजवीकडची वाट पकडावी.डावीकडची वाट आपणास माथेरानला घेऊन जाते. डोंगराच्या दिशेने जाताना मैदान,पोल्ट्रीफार्म,अर्धवट घरांची बांधकामे या काही खुणा सांगता येतील. त्यानंतर समोर दिसणा-या इलेक्ट्रिकच्या मोठमोठा टॉवरच्या दिशेने मार्गक्रमण करावे. सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर आल्यावर तेथून थोडे पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. या धबधब्याजवळ आपल्याला तीन वाटा लागतात. १) धबधब्याला लागून असलेली वाट. २) मधून गेलेली मुख्य वाट. ३) टॉवर्सला लागून असलेली वाट.