गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By मनोज पोलादे|

त्रिंबकेश्वर

नाशिक पासून 30 कि.मी. अंतरावर‍ गोदावरी नदीच्या तीरावर त्रिंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. येथील शिवलींगाचे वैशिष्ट म्हणजे या शिवलींगावर ब्रम्हा, विष्णू, महेश यांची रूपे आहेत.

AK
येथील देऊळ पुर्णपणे काळ्या दगडापासून बनले असून ब्रम्हगीरीच्या पवाताच्या पायथ्याशी आहे. वेगवेगळे धार्मिक कार्यांसाठी महाराष्ट्रातून लोक येथे येतात.

AK
नारायण-नागबळी, काल-सर्प शांती, त्रिपींड विधी येथे केल्या जातात. नारायण नागबळी ही पुजा फक्त त्रिंबकेश्वर येथेच केली जाते. ही पुजा तीन दिवसांची असते.

येथे ब्राम्हणांची संख्या पुष्कळ आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर आश्रम व मठ आहेत. पावसाळ्यात येथे निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे असते.

जाण्याचा मार्ग :
नाशिक पासुन 30 कि.मी. अंतरावर हे देऊळ आहे.