शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

प्लॅन फॉर युवर 31 डिसेंबर....

नवीन वर्ष अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपले असताना नवीन वर्षाच्या स्वागतासाठीचे बेत आखले जाऊ लागले आहेत. यंदा बर्‍यापैकी थंडीचा मौसम सुरू झाला असल्याकारणाने स्पॉट ठरविण्यासाठी एकच गोंधळ उडाला आहे. नेहमीच्या ठिकाणी जायचं, जवळ कोठेतरी जायचं की अजून कोठे? तर काही जणांना शांत ठिकाणी जायचं आहे. नवीन वर्षाचे जोशात स्वागत आणि सरत्या वर्षाला गुडबाय करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास डेस्टिनेशन्स शोधले आहेत. ही डेस्टिनेशन्स तुममच्या ओळखीची असली तरी यांदाच्या न्यू इयर पार्टीसाठी यांचा विचार करायला हरकत नाही. सो प्लॅन फॉर युवर 31 डिसेंबर....

सापुतारा

WD


निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी सापुतारा हे ठिकाण गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर व मुंबई आणि नाशिकपासून अगदी जवळ आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील व गुजरात राज्यातील पर्यटक प्रामुख्याने या ठिकाणी सहलीचा बेत आखतात. डांग जिल्ह्यात प्रामुख्याने आदिवासी वस्ती असल्यामुळे आतापर्यंत पर्यावरणाला कुठलीही झळ पोहोचलेली नाही. त्यामुळे इथलं निसर्गसौंदर्य अबाधित राहिलेले आहे. परंपरा आणि नावीन्यता यांची जपणूक करत इथल्या ोमंडळींनी सापुतारा हा आकर्षक बनवलेला आहे. आधुनिक पर्यटन शैलीत येणार्‍या गोष्टीदेखील या ठिकाणी आहेत. डोंगराळ रांग, सुंदर सरोवर, डांग जंगल, पूर्णा अभयारण्य, न्याहाळत राहावा असा सूर्योदय आणि सूर्यास्त, त्याच्या सोबतीला नयनरम्य महादेवाचे मंदिर, वस्तुसंग्रहालय, काष्टशिल्पाचे सौंदर्य, वनवाटिका, मिलेनियम गार्डन, पुष्पक रोपवे, हनी सेंटर, रोड गार्डन, फॉरेस्ट नर्सरी, स्वामी नारायण मंदिर, गर्व्हनर हिल, लॉग हट, जैन मंदिर अशा गोष्टी पर्यटकांना भुरळ पाडतात. तिथून जवळच निरा धबधबा, वणीचे मंदिर, हतगड किल्ला, शबरी मंदिर अशी स्थळंदेखील पाहता येतात.

पुढे पहा रुपेरी वाळूत-रत्नागिरी..


रुपेरी वाळूत-रत्नागिरी..

WD


रत्नागिरीपासून जवळच रत्नदुर्ग हा किल्ला आहे. याशिवाय दापोलीजवळ सुवर्णदुर्ग आहे. या किल्ल्यावरही दुर्गप्रेमींना फेरफ टका मारता येतो. घोड्याच्या नालीच्या आकाराचा भगवती किल्ला हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य. या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला दोन किनारे आहेत. त्यापैकी एका किनार्‍यावर काळी वाळू तर दुसर्‍या किनार्‍यावर पांढरी वाळू दिसते.

भगवती मंदिर सुमारे ४00 वर्षांपूर्वीचे आहे. या ठिकाणच्या ३00 फूट उंचीच्या टेकडीलाच गणपती मानण्यात येते. इथल्या समुद्रकिनार्‍यामुळे हे भाविकांचं आवडतं स्थान आहे. इथून जवळच मालगुंड आहे. प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत यांचं जन्मस्थान. रत्नागिरीपासून २२ किमीवर आहे पावस. इथं स्वामी स्वरूपानंदांचा आश्रम आहे. अतिशय मोठं पण स्वच्छ असं हे ठिकाण. पावसहून जवळच गणपतीपुळे हे गणेशस्थान आहे. रत्नागिरीहून चिपळूणला जायचं. इथलं परशुरामाचं मंदिर फार प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा घुमट चर्चसारखा आहे, तर गिलावा मुस्लिम पद्धतीचा. दापोली तालुक्यातील हर्णे बंदर निसर्गरम्य म्हणून ओळखलं जातं. हर्णेहून नदी ओलांडली की आंजर्ले गावाला जाता येते. इथला कड्यावरचा गणपती प्रसिद्ध आहे. आंजर्लेचा समुद्रकिनारा, तिथली शांतता ही खास अनुभवण्यासारखी गोष्ट आहे. रत्नागिरीपासून फक्त ३ किमी अंतरावर भाट्ये गाव आहे. अगदी निवांत, गजबजाटापासून दूर. इथला समुद्रकिनाराही अगदी शांत आहे. ज्याला आपण व्हजिर्नबीच म्हणतो असा. या किनार्‍यावर सुरूच्या झाडांची घनदाट लागवड केल्याने हा भाग 'सुरूचं बन' म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथलं खरं आकर्षण म्हणजे बॅकवॉटर्समधून बोटीनं होणारी दत्तमंदिरापर्यंतची फेरी. आजूबाजूला नारळी-पोफळीच्या बागा, दाट झाडी, किनार्‍यावरची कौलारू घर आणि त्यातून पाण्याला छेदत जाणारी बोट. दापोली परिसरातील ताडघर-तमासतीर्थ हेही समुद्रावर प्रेम करणार्‍यांचं आवडतं ठिकाण. तांबडी रेती हे या किनार्‍यावरचे वैशिष्ट्य. इथला मुरुडकर्देचा समुद्रकिनाराही प्रसिद्ध आहे. कर्दे गाव टिपिकल कोकणातलं, लालमातीतलं, गर्दराईचं. दापोलीहून ५४ किमीवर असलेले केळशी. इथल्या वाळूच्या टेक डीवरून सूर्यास्ताचा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा. केळशीचा समुद्रकिनारा स्वच्छ, पांढर्‍या वाळूचा, सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा आहे. एक दिवस किनार्‍यांवरून फेरफटका मारा, समुद्रात मनसोक्त डुंबा, भिजा. मऊ गार वाळूचा तुमच्या तळपायांना स्पर्श होऊ द्या आणि अनुभवा आयुष्यातील सर्वोच्च सुख.

पुढे पहा केळवे-डहाणू-बोर्डी....

केळवे-डहाणू-बोर्डी

WD


ठाणे जिल्ह्यातील पश्‍चिम किनारपट्टीवरील केळवे हा एक चांगला समुद्रकिनारा आहे. शितलादेवीसाठी प्रसिद्ध असणार्‍या केळवे गावचा समुद्रकिनारा पर्यटकांच्या मनाला भुरळ पाडतो. एका दिवसाच्या भटकंतीसाठी हे समुद्रकिनारे मुंबईकरांना सोयीचे आहेत. केळवे हे मुंबई-डहाणू रोड या उपनगरीय रेल्वे मार्गावरील केळवे रोड या स्थानकापासून ८ किमीच्या अंतरावर आहे. तर केळवे रोड हे मुंबईपासून २ तासांच्या अंतरावर आहे.

डहाणू-बोर्डीचा समुद्रकिनारा हा खरं तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या सौंदर्याचा एक आरंभ बिंदूच जणू. तब्बल १७ किमी पसरलेल्या या समुद्रकिनार्‍याचे सौंदर्य अगदीच अनवट व अनागर. वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृतीची पार्श्‍वभूमी असलेल्या या परिसरातील सुमद्रकिनार्‍याची अनुभूती आगळी-वेगळीच. माणसांच्या गर्दीने गजबजलेले स्पॉट या परिसरात दिसत नाहीत. मात्र ज्यांना शांतता आणि निवांतपणाची आवड आहे त्यांनी या परिसरात जरूर जावे. डहाणू हे पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई-सुरत रेल्वे मार्गावरील डहाणू रोड स्थानकापासून जवळच आहे. डहाणूपासून बोर्डी हे १५ किमी तर मुंबईपासून १४५ किमी अंतरावर आहे. येथे राहण्याची आणि खाण्याची सोय आहे.

पुढे पहा काशीद-मांडवा-किहीम...

काशीद-मांडवा-किही

WD


काशीद हा तसा मुंबईपासून एक जवळचा आणि लोकप्रिय समुद्रकिनारा. अलिबाग-मुरुड रस्त्यावरचे काशीद हे प्रसिद्ध आहे ते केवळ नयनरम्य समुद्रकिनार्‍यासाठी आणि चवदार माशांसाठी. काशीद हे अलिबाग-मुरुड रस्त्यावर अलिबागपासून जवळपास ३0 किमी अंतरावर आहे. मुरुड शहर काशीदपासून १८ किमीवर आहे. मुंबईतील अनेक नामांकितांनी मांडवा परिसरात बंगले बांधले आहेत. तसे मांडवा एक छोटंसं गाव. मात्र बंदराची सुविधा असल्याने मुंबईहून येणे-जाणे अतिशय सुलभ. नारळ आणि पामच्या झाडीत हरवलेल्या मांडवा-किहीमचा समुद्रकिनारा मुंबईच्या जवळ असूनही शांत आहे. मुंबईपासून गेटवे ऑफ इंडियापासून मांडवा हे बोटीने तास-सव्वा तासाच्या अंतरावर आहे. मांडव्यापासून किहीम हे अलिबाग रस्त्यावर ११ किमी अंतरावर आहे. येथे राहण्याची आणि खाण्यची उत्तम सोय आहे.

पुढे पहा चिल्ड माथेरान...

चिल्ड माथेरान

WD


साधारणत: एक शतकापूर्वी ब्रिटिशांनी वसवलेल्या माथेरानचा त्यानंतर एक पर्यटनस्थळ म्हणून विकास झाला आहे. रायगड जिल्ह्यातले माथेरान हे पर्यटनाच्या नकाशाच्या अग्रभागी असलेले एक आकर्षक स्थळ आहे. पावसाळय़ातील माथेरानची भटकंती जशी मिस करता येत नाही तशीच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी माथेरानची सहल ही विसरता येत नाही.

पश्मिच घाटातले मुंबईजवळचे हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्यामुळे मुंबई आणि पुण्याबरोबरच देशातील विविध भागांतील पर्यटक , विदेशी पर्यटक माथेरानला आवर्जून भेट देतात. उंचावर वसलेले जंगल हा शब्दशा अर्थ असलेले माथेरान समुद्रसपाटीपासून ७९२ मीटर उंचीवर वसले आहे. इथल्या लाल मातीच्या रस्त्यांनी इथले वातावरण अधिकच सफ रदायी बनवले आहे. घोड्यावरून केलेली माथेरानची सफर किंवा लाल मातीच्या सान्निध्यातून फिरलेले माथेरान आपल्याला नेहमीच लक्षात राहते. येथे पाहण्यासारखे अनेक पॉइंट्स आहेत. वनई हिल, मंकी, इको लॅण्डस्केप, लिटील चौक, ग्रेट चौक, शार्लेट तलाव, वूडवर्ड हे त्यापैकी काही पॉइंट्स. पुणे-मुंबई लोहमार्गावरच्या नेरळ रेल्वे स्टेशनला उतरून माथेरानक डे जाणार्‍या नॅरोगेज रेल्वे (मिनी ट्रेन)चा प्रवास म्हणजे एक प्रकारची पर्वणीच. या मिनी ट्रेनने थेट माथेरानच्या बाजारपेठेत पोहोचता येते. मुंबईचे प्रसिद्ध व्यापारी सर आदमजी पिरभॉय यांनी १९0७ मध्ये ही मिनी ट्रेन सुरू केली. साधारण २१ किमीचा प्रवास ही मिनी ट्रेन घडवते. या मिनी ट्रेनने माथेरानकडे जाताना वाटेत जुम्मापट्टी, वनकोस टिनेल, वॉटर पाइप, अमन लॉज स्थानक ही स्टेशन्स लागतात. त्याशिवाय माथेरानला नेरळपासून शेअर टॅक्सीनेही जाता येते.

पुढे पहा लोणावळा-खंडाळा...

लोणावळा-खंडाळ



WD

नवीन वर्ष अगदी उंबरठय़ावर येऊन ठेपले असताना नवीन वर्षाच्या स्वागतासाठीचे बेत आखले जाऊ लागले आहेत. यंदा बर्‍यापैकी थंडीचा मोसम सुरू झाला असल्याकारणाने स्पॉट ठरविण्यासाठी एकच गोंधळ उडाला आहे. नेहमीच्या ठिकाणी जायचं, जवळ कोठे तरी जायचं की अजून कोठे? तर काही जणांना शांत ठिकाणी जायचं आहे. नवीन वर्षाचे जोशात स्वागत आणि सरत्या वर्षाला गुडबाय करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास डेस्टिनेशन्स शोधली आहेत. ही डेस्टिनेशन्स तुमच्या ओळखीची असली तरी यंदाच्या न्यू इयर पार्टीसाठी यांचा विचार करायला हरकत नाही. मुंबईच्या अगदी जवळ आणि शांत.. सो प्लॅन फॉर युवर ३१ डिसेंबर.र३मुंबईकरांना लोणावळा-खंडाळय़ाच्या कंच हिरवाईने नटलेल्या जुळय़ा डोंगररांगा नेहमीच खुणावत असतात. त्यामुळे मुंबईकरांची या सुंदर गिरीस्थानांकडे नेहमीच रिघ लागलेली असते. मुंबईपासून जेमतेम तीन तासांच्या अंतरावर आणि निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या लोणावळा-खंडाळय़ाची आणखी एक खासियत म्हणजे तेथे मिळणारी चटकदार चिक्की. असंख्य प्रकारच्या आणि अवीट चवीच्या या चिक्कीची चव चाखत लोणावळ-खंडाळय़ाच्या हिरव्यागर्द डोंगररांगांमधील प्रेक्षणीय स्थळांची सफर करण्याची मजा काही औरच आहे. इथल्या डोंगरकड्यांवरच्या ट्रेंकिगचा अनुभव तर केवळ अविस्मरणीय असतो. इथल्या भटकंतीत दुचाकीवरून अगदी सायकल असेल तरीही हिंडण्यातच खरी मजा अनुभवता येते. कारण प्रेक्षणीय स्थळे मुख्य शहरापासून दूरवरच्या डोंगरकड्यांमध्ये लपलेली आहेत. भुशी डॅम, वळवळ डॅम, कैवल्यधामचे योग इस्पितळ, ड्युक्स नोज, रायवूड पार्क आणि टायगर्स लीप ही या परिसरातील भुरळ घालणारी आणि आवर्जून भेट द्यावीत अशी खास ठिकाणे.

ड्युक्स नोज हा सुळका न्याहाळताना ड्युक ऑफ वेलिंग्टनच्या नाकाची आठवण येते आणि नावातलं हे साधम्र्य आपले कुतूहल आणखीनच चाळवते. या सुळक्यावरून दिसणार्‍या पर्वतरांगा, घनदाट जंगल आणि हिरव्या कंच दर्‍या न्याहाळताना श्‍वास रोखून क्षणभरासाठी देहभान हरपून जाते. तसेच टायर्गस लीप या एका खास जागेवरून लोणावळा-खंडाळय़ाच्या दर्‍याखोर्‍यांचे सौंदर्य न्याहाळणे हा एक आगळाच अनुभव असतो. अवघ्या दर्‍याखोर्‍यांवर एक दिमाखदार वाघ सुस्तपणे पहुडला आहे. म्हणून या जागेला टायगर्स लीप असं नाव पडल्याचं सांगतात. इथल्या दरीत दगड टाकलात की घुमणारे प्रतिध्वनी ऐकताना वयाचं भान विसरायला होतं आणि लहानपणीचा अल्लड खोडकरपणा नकळत पुन्हा डोकावून जातो.

पुढे लेणीभाजे....

लेणीभाजे

WD

लोणावळय़ाच्या डोंगरमाथ्यावरची ही दगडात कोरलेली लेणी म्हणजे बौद्धकालीन शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. कार्ल्याची भारतातील सर्वात प्राचीन बौद्ध क्षेत्रातील वास्तुशिल्पे आपल्याला आणखीनच जवळ वाटतात. ख्रिस्तपूर्व ८0 व्या शतकातील हे अप्रतिम शिल्प हत्तीच्या मुखांनी पेललेल्या ३७ खांबांवर उभारलेले आहे. एकेकाळी या हत्तीमुखांमध्ये हस्तीदंतदेखील होते, असे सांगितले जाते. भाजाच्या लेणी संकुलात १८ लेणी आणि १४ स्तूप आहेत. ख्रिस्तपूर्व २00 व्या शतकापासून अस्तित्वात असलेली आणि हिरवाईनं वेढलेली ही वास्तू शिल्पकलेतील आश्‍चर्य पाहताना आणि तिथल्या वास्तव्यातही एका शांततेची आगळी अनुभूती येते. कार्ल्याच्या या लेण्यांशेजारीच एकवीरा देवीचे मंदिर आहे. कोळी, मच्छीमार लोकांचे हे आराध्यदैवत. एकवीरेच्या दर्शनासाठी हजारो भक्तांची रीघ लागलेली असते. लोणावळा आणि खंडाळा ही सह्याद्रीच्या पश्‍चिम उतरणीवरच्या कुशीतील जेमतेम पाच किमीच्या परिसरात वसलेली मुंबई-पुणे महामार्गावरील ६२५ मीटर उंचीवरील ही ठिकाणे. लोणावळय़ापासून आठ किमीवर कार्ला आहे.