बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By वेबदुनिया|

महाराष्ट्राला केंद्गाकडून प्रथमच दोन मेगा सर्किट्स मंजूर

रु. 79 कोटी, 84 लाख निधीही प्रथमच मिळाला

MH GOVT
महाराष्ट्रातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने सन 2012-13 या वर्षात केंद्गीय पर्यटन मंत्रालयास पाठविलेल्या विविध प्रस्तांवापैकी सोलापूर-पंढरपूर-अक्कलकोट-तुळजापूर मेगा सर्किट व औरंगाबाद मेगा सर्किट ही दोन सर्किट्स एकाच आर्थिक वर्षात प्रथमच केंद्गाने मंजूर केली असून एकाच वर्षात म्हणजे सन 2012 -13 या वर्षासाठी 79 कोटी, 84 लाख रुपये एवढा निधी पर्यटकांच्या सोयीसाठी मंजूर केला आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रस्ताव केंद्ग शासनाकडे पाठविले होते. भारत सरकारचे पर्यटन मंत्री श्री.चिरंजीवी यांच्या समवेत भुजबळ यांनी अनेक बैठका घेऊन त्यामध्ये महाराष्ट्राचे हे प्रस्ताव मान्य करण्याची आग्रही विनंती केली होती. त्यानुसार या प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. त्यामध्ये वरील दोन सर्किट्स व्यतिरिक्त महाबळेश्र्वर-कास-बामणोली आणि आगाशिव गुंफा यांचा समावेश असलेले सातारा सर्किट आणि पानशेत स्थळ विकास यांना मंजुरी मिळाली असून धापेवाडा-पराडसिंगा सर्किट तसेच नाशिक येथे द्गाक्ष-वाईन पार्कसाठी स्थळ विकास या दोन प्रस्तावांना केंद्गाकडून लवकरच मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सोलापूर-तुळजापूर मेगा सर्किटसाठी 43 कोटी, 87 लाख रुपये एवढ्या रक्कमेस मंजुरी मिळाली आहे. या सर्किट अंतर्गत सोलापूर (सिध्देश्र्वर मंदीर), पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर या ठिकाणी पर्यटक माहिती सुविधा केंद्गाची उभारणी, अंतर्गत सुशोभीकरण, वाहनतळ, पदपथ, रस्ते, स्वच्छतागृह, घनकचरा व्यवस्थापन, मल:निस्सारण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इत्यादी कामे करण्यात येणार आहेत.

औरंगाबाद मेगा सर्किटसाठी 23 कोटी 50 लाख रुपये एवढ्या रक्कमेस मंजुरी मिळाली असून या प्रस्तावांतर्गत औरंगाबाद शहरातील बीबीका मकबरा, पाणचक्की, रोझ गार्डन, नक्कारखाना गेट, दौलताबाद किल्ला, पर्यटन महामंडळाच्या कार्यालयासमोर टॅक्सी केंद्ग, अजिंठा व्हयु पॉईंट आणि नेवासा तालुक्यातील देवगड येथील घाटाचा विकास याबरोबरच पर्यटन माहिती सुविधा केंद्ग, वाहनतळ, पदपथ, स्वच्छतागृह, घाट बांधकाम, सूचना व माहिती फलक, मल:निस्सारण व्यवस्था इत्यादी कामांचा समावेश आहे. याखेरीज, अजिंठा वेरुळ येथे पर्यटकांकरिता ग्रीन बसेसची सुविधा उपलब्ध करण्यासाठी 90 लाख रुपये केंद्गाने मंजूर केले आहेत.

सातारा सर्किट अंतर्गत 8 (आठ) कोटी 1 (एक) लाख रुपये इतक्या रक्कमेस केंद्गाने मंजुरी दिली असून यामध्ये महाबळेश्र्वर येथे घनकचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, कास येथे पठाराला तारेचे कुंपण, वाहनतळ, निरिक्षण मनोरा, बामणोली येथे आवार भिंत, पर्यटक माहिती सुविधा आणि आगाशी व गुंफा येथे घनकचरा व्यवस्थापन, वाहन तळ इत्यादी कामे हाती घेण्यात येणार आहेत.

पुणे जिल्हयातील पानशेत येथे पर्यटनस्थळ विकास करण्यासाठी 3 कोटी 60 लाख रुपये एवढ्या रक्कमेस मंजुरी मिळाली असून या ठिकाणी देखील जलजीवन प्रदर्शन केंद्ग अर्थात ऍक्वाटीक पार्क आणि वरील प्रमाणे कामे हाती घेण्यात येणार आहेत.

वरील प्रस्तावा व्यतिरिक्त नाशिक येथे द्गाक्ष-वाईनपार्क स्थळ विकास ( परिक्षण केंद्ग, द्गाक्ष-वाईन महोत्सवाकरिता पायाभूत सुविधांची निर्मिती इत्यादी कामे ) आणि धापेवाडा-पराडसिंगा सर्किट (घाट बांधकाम पोच रस्ते, विद्युतीकरण, स्वच्छतागृह, पदपथ अंतर्गत रस्ते इत्यादी कामे ) हे पर्यटन विषयक पाठविलेले महाराष्ट्राचे दोन प्रस्ताव निधीसाठी केंद्गाच्या विचाराधीन असून तेही लवकरच मंजूर होतील, अशी अपेक्षा आहे.