शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By मनोज पोलादे|

सातपुड्याच्या रांगांमधून खानदेशाची ओळख

तोरणमाळ

MH GovtMH GOVT
खानदेशात सातपुडा पर्वतरांगात असलेले तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण समुद्रसपाटीपासून साडेअकराशे मीटर उंचीवर आहे. सातपुड्याच्या तोरणमाळ रांगापलीकडे मध्यप्रदेशातून नर्मदा नदी वाहते. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळला पोहचताना गाडी डोंगरास वळसा घालून मार्गाक्रमण करते. सातपुडा जणु पर्यटकांची परिक्षाच घेत असतो. एक नाही दोन नाही तब्बल सात फेर्‍या घातल्यानंतर गाडी तोरणमाळला पोहचते. येथे पोहचेपर्यंतचे दृश्य मात्र डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.

सातपुड्याची जादूच काही और आहे. तोरणमाळ हा सातपुड्याच्या पर्वतरांगात पसरलेला साधारणत: चाळीस चौरस किलोमीटरचा जमीनीचा टापू आहे. ह्या परिसरातून वाहणार्‍या झर्‍यांपासूनच यशवंत व लोटस ही दोन तळी निर्माण झाली आहेत. दक्षिण भागात यशवंत तलाव तर उत्तर भागात लोटस तळे आहे. हा तलाव नेहमी कमळाच्या फुलानी डवरलेला राहत असल्याने तळ्याचे लोटस हे नांव प्रचलित झाले. लोटस तळ्यात सामावणारा हा प्रवाह पर्वताच्या उंच कड्यावरून सिता खाईत कोसळतो.

पावसाळ्यात कड्यावरून फेसाळत कोसळणार्‍या
MH GovtMH GOVT
पांढर्‍याशुभ्र धबधब्याचे दृश्य नेत्रांच्या चोकटीत घट्ट बसते. ह्यातील तोरणमाळ रांगेच्या परिसरात नैसर्गिक सौदर्यासोबतच प्राणीसंपदा, औषधी व इतर वनस्पतींची लयलुट आहे. परिसरातील स्वर्गीय व कोणत्याही प्रदृषण व मानवी हस्तक्षेपापासून मूक्त निसर्ग आपणांस भरभरून आनंद देतो. तोरणमाळ परिसरातल्या जंगलात भटकंती केल्यास आवळा, हिरडा, बेहडा, तुळशी, निलगिरी, बेल, कोरफड यासारख्या वनस्पती दृष्टीत पडतात.

येथील यशवंत तलावाच्या परिसरात औषधी वनस्पतींचा बगीच्याही आहे. तलावाचा परिसर हिरव्याकच्च वनराईने नटलेला आहे. उन्हाळ्याच्या अंगाची लाही लाही करणार्‍या कडक उन्हातही तलावात पाणी बघून तर चित्त प्रसन्न होते. जंगलात भटकून झाल्यावर सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस विरूगुळ्यासाठी काठावर येणार्‍या पर्यटकांशी हा तलाव हृदयाच्या ओलाव्यातून जिव्हाळा निर्माण करतो. पर्यटकांची व यशवंत तलावाच्या नात्याची वीण दिवसेंदिवस अधिकच घट्ट झाली आहे.

MH GovtMH GOVT
नौका विहारासाठी बोटींची व्यवस्थाही आहे. जंगलात मूक्त भटकतांना ह्या परीसराची ओळख व वैशिष्ट्य असणारे दगड व खडकही आपल्याशी मैत्रीचे नाते जोडते. चौकस व अभ्यासू पर्यटकांना येथील दगड व खडकातही मित्र भेटल्यास नवल वाटू नये. ह्या परिसरातच नागार्जून हे तीर्थस्थळही आहे. परिसरातील गोरखनाथ मंदिरात महाशिवरात्रीस भव्य यात्रा भरते. जिल्हत्या्तल्या भाविकांसोबतच मध्यप्रदेश व गुजरातमधील गावातुनही हजारो भाविक अनवाणी चालत गोरखनाथाच्या चरणी माथा टेकवण्यासाठी येतात. गुफाचे दर्शनही घडते.

मच्छिद्रनाथ गुफा त्यापैकीच एक. परिसरात निर्सगाशी संवाद साधायला आलेला पर्यटक दोन घटका थांबुन श्रद्धेने नागार्जूनाचे दर्शन घेते. जैविक व नैसर्गिक विविधता जोपासणार्‍या सातपुड्याच्या तोरणमाळ रांगात मनोहारी दृश्यांचे दर्शन घडविणारे नागार्जून, खडकी, आमदरी व सनसेट पॉईंट ही पर्यटकांची विशेष आकर्षण केंद्रे आहेत. निसर्गाच्या उपासकांसोबतच साहसी पर्यटकांना हे पॉईंट खुणावतात. साहसास प्रोत्साहन देणार्‍या ह्या पॉईंटवरून दिसणार्‍या दर्‍यांच्या खोलीत झाकायचा प्रयत्न केल्यास हृदयास धाप लागते.

सातपुड्यातील हे कडे ट्रेकर्सना आव्हान करतात.
MH GovtMH GOVT
अनं ट्रेकर्सही आव्हानाचा स्विकार करत कड्यांच्या अंगाखाद्यावर खुशाल बाळगतात. तोरणमाळच्या उंचच-उंच कपारींवरून दुरवर दृष्टी टाकल्यास निर्सगाच्या अविष्कारासोबतच ह्या निसर्गरम्य परिसरातील पारंपारिक वास्तव्य करणार्‍या आदिवासी बांधवांच्या वस्त्यांवरही नजर खिळते. आदिवासी संस्कृतीही येथे जवळून न्याहाळता येते. तोरणमाळला एका दिवसाची धावती भेट तर देता येतेच मात्र, ह्या भागातील इतिहास, भूगोल व संस्कृती समजून घ्यायची झाल्यास मुक्कामासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळ व वन विभागाच्या विश्रांती‍गृहात मुक्कामही ठोकता येते.


जाण्याचा मार्ग : तोरणमाळला पोहचण्यासाठी आधी धुळे गाठायचे. नंदुरबारही रेल्वेने जोडले आहे. धुळे रेल्वे व महामार्गाने राज्यातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. एकदाचे धुळे जवस केले की तोरणमाळला जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे. विमानाने जायचे झाल्यास औरंगाबाद हे जवळचे विमानतळ आहे.