बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Updated : रविवार, 14 एप्रिल 2024 (09:03 IST)

रविवारी करा आरती सूर्याची

surya aarti lyrics in marathi
जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या ।
एकारति ओवाळु सुरगण - प्रभुवर्या ॥धृ॥
द्वादश नामें करुनि करितां तव प्रणती ।
दोष निवारुनि इच्छित मनोरथ पुरती ।
अर्ध्यप्रदान करितां पुण्याची प्राप्ती ।
दर्शनमात्रें साधक भवसागर तरती ॥१॥
ब्राह्मणकुळासि दैवत तुजवांचुनि नाहीं ।
त्रिकाळ अर्घ्य देती द्विजवर लवलाहीं ॥
प्रथम अहूति अर्पण यज्ञाचे ठायीं ।
सर्व जगाचि दृष्टी तुजयोगें पाहीं ॥२॥
दशयोजन मोठा रथ निजसारथि अरुण ॥
सप्तमुखाचा अश्व शोभतसे वहन ।
अठ्यायशीसहस्त्र ऋषि करिति स्तवन ।
निरंजन प्रार्थितसे करुनिया नमन ॥३॥