गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

दाट केसांसाठी बेसन हेअर मास्क

त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी बेसन वापरले जातं परंतु काय आपल्या हे माहीत आहे की बेसनामुळे केसदेखील लांब आणि दाट होतात?
 
आपले केस रुक्ष आणि कितीही डल असले तरी बेसन यावर फायदेशीर ठरेल. बेसन मास्कने केसांच्या प्रत्येक समस्यांनी सुटकारा मिळतो. बघू कसे वापरायचे ते:
बेसन आणि दही
बेसनात जरा दही मिसळा. डोक्यात खाज सुटत असेल तर चिमूटभर हळद मिसळा. आता हे मिश्रण केसांच्या मुळात लावा. आता डोक्यावर शॉवर कॅप घाला आणि अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.
 
बेसन आणि अंडी
हे शैंपू आणि कंडिशनरप्रमाणे परिणाम देतं. दोन चमचे बेसनात एका अंड्याचा पांढरा भाग मिसळा. यात एक चमचा लिंबू आणि मध मिसळा. सर्व व्यवस्थित मिसळून घ्या. आता हा मास्क केसांच्या मुळात लावा. थोड्या वेळ वाळू द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.

बेसन आणि जैतून तेल
याने केस दाट होतात. 2-3 चमचे बेसन घेऊन त्यात जैतूनचे तेल मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. आता ही केसांच्या मुळात लावा आणि काही वेळासाठी सोडून द्या. केस अती कोरडे पडण्यापूर्वीच कोमट पाण्याने धुऊन टाका.
 
बेसन आणि बदाम पावडर
बेसनात बदाम पावडर मिसळून त्यात जरा लिंबाचा रस, मध आणि दही मिसळा. मिक्स करून हे मास्क केसांच्या मुळात लावा. थोड्यावेळ तसेच राहून द्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. ही प्रक्रिया आठवड्यातून दोनदा अमलात आणा. आपले केस अती खराब झाले असल्यास या मिश्रणात व्हिटॅमिन इ तेलाची कॅप्सूल मिसळू शकता.

बेसन आणि मेयोनेज
बेसनात मेयोनेज मिसळून केसांवर लावल्याने चांगले परिणाम समोर येतात. 6 चमचे मेयोनेजमध्ये 3 चमचे बेसन मिसळा. आता या मिश्रणात मध मिसळा. हे मास्क पूर्ण केसांवर लावा.
बेसन केसांमध्ये लावण्याचे काही फायदे:
याने केस मजबूत होतात.
डोक्यावरील त्वचा स्वच्छ होते.
कोंड्यापासून सुटकारा मिळतो.
दोन तोंडी केसांवर फायदेशीर ठरेल.
केस नरम आणि चमकदार होतात.