गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

ओठांभोवती काळपटपणा दूर करण्यासाठी उपाय

आम्ही आपल्याला ओठांभोवती असलेला काळपटपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगत आहोत. 
लिंबाचा रस- व्हिटॅमिन सी विपुल मात्रेत असल्यामुळे लिंबू एका नैसर्गिक ब्लिचिंग रूपात काम करतं. लिंबाचा रस प्रभावित जागेवर लावावा. 10-15 मिनिटाने धुऊन टाकावा आणि एका आठवड्यात परिणाम दिसून येईल. 
 
हळद- हळद पिग्मेंटेशन दूर करण्यात मदत करते. दह्यात हळद मिसळून चेहर्‍यावर लावावी. 
 
दही- दह्यात आढळणारे लॅक्टिक ऍसिड आपल्याला काळे डाग आणि पिग्मेंटेशनपासून सुटका होते. अंघोळीआधी चेहर्‍यावर दही लावल्याने चांगले परिणाम मिळतील.