शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

तजेलदार त्वचेसाठी आवश्यक आहे हे व्हिटॅमिन्स...

ड्राय आणि सुरकुतलेल्या त्वचेसाठी आपला आहार जबाबदार आहे. पर्याप्त पोषण मिळाल्यावर आपलीही त्वचा तजेलदार होऊ शकते. तसे तर विभिन्न त्वचेसाठी वेग वेगळ्या आहाराची गरज असते परंतू निरोगी आणि तजेलदार त्वचेसाठी आपल्या आहारात हे व्हिटॅमिन्स असणे गरजेचे आहे. पाहू ग्लोइंग स्किनसाठी आवश्यक व्हिटॅमिन्स...
सर्वप्रथम आपल्याला भरपूर पाणी प्यायला हवं. पाणी स्किनसाठी सर्वश्रेष्ठ औषधी आहे. पाणी आपल्या पूर्ण शरीराला रिफ्रेश करतं आणि आपल्या त्वचेला चमकदार करण्यात मदत करतं.
 
स्किनसाठी व्हिटॅमिन्स...

ज्या प्रकारे शरीराला ऑक्सिजनची गरज आहे त्या प्रकारे स्किनसाठी व्हिटॅमिन्स आवश्यक आहे. पुढीलप्रमाणे व्हिटॅमिन्स आपल्या त्वचेला तजेलदार ठेवण्यात मदत करतील:
 
व्हिटॅमिन सी : हे रसदार फळांमध्ये आढळतं जसे संत्रं, लिंबू आणि मोसंबी
 
व्हिटॅमिन ए : याचे मुख्य स्रोत आहे- पपई, संत्रं, एग यॉर्क
 
व्हिटॅमिन बी : हे फळांसह सर्व पालेभाज्यांमध्ये आढळतं
 
व्हिटॅमिन इ : हे शेंगदाणे आणि इतर ऑइल सीड्समध्ये आढळतं.