बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

लपवा स्ट्रेच मार्क्स

* एरंडेल तेल आणि कोको बटर यांचं मिश्रण तयार करून स्ट्रेच मार्क असलेल्या भागावर मसाज करा. यामुळे त्वचेला ओलावा मिळून मार्क कमी व्हायला मदत होईल.

* स्ट्रेच मार्क्सवर कोरफडीचा गर लावा. 10 मिनिटे हळुवार मसाज केल्यावर त्याला वाळू द्या. साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर धुऊन टाका.

* अ आणि इ जीवास्तवाच्या कॅप्सुल्स फोडून त्यातलं औषध एकत्र करा. मार्क्सवर हे लावा. त्वचेच्या आत मुरेपर्यंत मसाज करत राहा.

* बदामाचं तेल, गव्हांकूर आणि अर्गन ऑइल याचं मिश्रण तयार करा. गरोदरपणात दिवसातून दोन वेळा याने पोटावर हळुवार मसाज करा. याने स्ट्रेच मार्क्स पडणार नाही.

* इंस्टंट मार्क्स लपवायचे असतील तर बॉडी फाउंडेशन, ब्रोंझर किंवा कन्सिलर स्ट्रेच मार्क्सवर लावा.