गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 14 जून 2014 (12:41 IST)

सावधान, हेअर डायमुळे कॅन्सरचाही धोका

केसाला विविध प्रकारचा रंग लावून अनेकदा मित्रमंडळीत वाहवा मिळवण्याची एक स्पर्धाच तरुणांमध्ये पाहायला मिळते. मात्र जरा सावधान, कारण विविधरंगी हेअर डाय केल्याने कॅन्सर होण्याची दाट शक्यता आहे. स्वीडन येथील एका विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. संशोधकांना अशा प्रकारचा कलर डाय करणार्‍या व्यक्तीच्या रक्तामध्ये ओ-टोलोइडाइन्स हा कॅन्सर पसरवणारा गुणधर्म  आढळून आला.

संशोधकांनी नुकतेच याबाबत काही लोकांवर प्रयोग केले. या प्रयोगात संशोधकांनी 295 हेअरड्रेसर्स महिला, सातत्याने डाय करणारे 32 व्यक्ती आणि केव्हाही डाय न केलेल्या 60 व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासले. यामध्ये हेअरड्रेसर्स तसेच नेहमी  डाय करणार्‍या व्यक्तींच्या रक्तामध्ये ओ-टोलोइडाइन्स आणि एम - टोलोइडाइन्स हा कॅन्सर पसरवणारा गुणधर्म आढळून आला. दरम्यान हेअरड्रेसर्स हातमोजे घालून टोलोइडाइन्सपासून आपला बचाव करू शकतात. मात्र, हेअरडाय करणार्‍यांना यापासून बचाव करावयाचा असेल तर अशा डायचा त्याग करणे हा एकच पर्याय उरतो. त्यामुळे आपले आरोग्य सांभाळायचे असेल तर अशा मोहापासून दूरच राहावे लागेल.