गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

अंगाला चटके देण्याची विचित्र प्रथा

WDWD
श्रध्दा आणि अंधश्रध्दा या सदरात आज आम्ही आपल्याला केरळच्या पलक्कड जिल्ह्याच्या शोरनूर गावातील एका आगळ्यावेगळ्या प्रथेचे दर्शन घडविणार आहोत. अंधश्रद्धेचा या भागात एवढा पगडा आहे, की आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी या भागातील लोक अंगावर चटके घेतात. पण त्यातही वैशिष्ट्य असे की चटके घेऊनही त्यांच्या शरीरावर काहीही इजा होत नाही.

या प्रथेला अयप्पन विलक्क असे म्हणतात. शबरीमला येथील प्रसिद्ध मंदिराची यात्रा करण्यापूर्वी भाविक या प्रथेचे पालन करतात. केरळच्या मध्य आणि उत्तरी भागात ही प्रथा बघावयास मिळते.

प्रायश्चित्त घेण्यासाठी नारळाच्या आणि
WDWD
ताडाच्या पानांनी शबरीमाला मंदिराची प्रतिकृती तयार केली जाते. हे मंदिर अतिशय कलात्मक असते. वृक्षांच्या फांद्यांनी मंदिर सजविले जाते. परंपरागत वाद्ये वाजवून संध्याकाळी पूजा केली जाते. अयप्पा प्रभूंची भजने आणि पूजा केल्यानंतर अय्यप्पा आणि बाबर यांच्यात प्रतिकात्मक युध्द होते.

यानंतर अयप्पन विलक्क हा विधी होतो. येथे सुरवातीला हा विधी माहित असलेले दोन लोक मंदिराभोवती नृत्य करत प्रदक्षिणा घालतात. हे करत असताना विविध हालचाली केल्या जातात.

  नृत्य करता करता हे पलिते अंगाला घासतात. जवळपास एक तास हा विधी चालतो. एवढा वेळ जळती आग शरीरावर घासूनही काहीही इजा होत नाही. प्रभू अयप्पांच्या कृपेमुळे काहीही त्रास होत नाही, असे भाविकांचे म्हणणे आहे.      
रात्री या विधीला सुरवात होते. यावेळी पलिते पेटविले जातात. हे पलिते ते चक्क अंगाला घासतात. या नंतर ते 'चेंदा' नावाच्या ड्रमच्या तालावार ते नृत्य करतात. पुन्हा नृत्य करता करता हे पलिते अंगाला घासतात. जवळपास एक तास हा विधी चालतो. एवढा वेळ जळती आग शरीरावर घासूनही काहीही इजा होत नाही. प्रभू अयप्पांच्या कृपेमुळे काहीही त्रास होत नाही, असे भाविकांचे म्हणणे आहे.

या विधीनंतरही जळत्या निखार्‍यांवर चालण्याचीही एक प्रथा आहे. स्थानिक भाषेत त्याला 'कनाल अट्टम' म्हटले जाते. यात प्रायश्चित्त घेणारे लोक आपल्या मार्गदर्शकासोबत जळत्या निखार्‍यांवरून अनवाणी चालत जातात.

या प्रथेविषयी तुम्हाला काय वाटते? आम्हाला नक्की कळवा.