गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

अडकित्तावाला बाबा

जबलपुरमधील भरो गावांतील घटना

ShrutiWD
'श्रद्धा आणि अंधश्रद्धा' या विशेष लेख मालिकेत आम्ही आपल्याला समाजातील अनेक प्रकारचे भोंदू बाबा आणि त्यांच्या भोंदुगिरीपासून सावध करण्याचा प्रयत्न केला. आमच्या या विशेष लेख मालिकेचा निव्वळ उद्देश म्हणजे समाज जागृती व लोकांना फसवणूकीपासून सावध करणे हा आहे.

आमच्या सूज्ञ वाचकांनी 'श्रद्धा आणि अंद्धश्रद्धा' यामधील भेद ओळखून योग्य निर्णय घ्यावा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणारी भोंदूगिरी ओळखून तिच्यापासून इतरांना सावध करावे.आज आमच्या या विशेष लेखात आम्ही आपल्यासमोर एक अत्यंत ह्रदयदावक घटना मांडत आहोत.

त्या घटनेत अकरा लोकांचा मृत्यू झाला होता. याला
ShrutiWD
कारणीभूत होता तो मध्य प्रदेशातील जबलपूरच्या सरोतावाला हा भोंदूबाबा. हा बाबा सुपारी कापण्याच्या अडकित्त्याने लोकांच्या डोळ्यांचा इलाज करण्याचा दावा करत असे. त्याच्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवून अनेक लोक त्याच्या जाळ्यात अडकले.

या बाबाचे खरे नाव ईश्वरसिंह राजपूत आहे. सुपारी कापण्याच्या अडकित्त्याने इलाज करत असल्यामुळे सामान्य लोक अडकित्तावाला बाबा या नावाने ओळखतात. याशिवाय सर्जन बाबा हेही त्याचे एक नाव आहे. डोळ्यांचा इलाज करणारा हा बाबा एड्स आणि कॅन्सरसारख्‍या रोगांचाही इलाज करत असल्याची अफवा पसरल्यामुळे इथे येणार्‍या लोकांच्या रांगच रांग लागलेली असायची.

बाबाची इलाज करण्याची पद्धत भयंकर म्हणावी अशीच होती. रूग्णाच्या तोंडावर घोंगडी टाकून त्याच्या डोळ्यात अडकित्त्याचा एक भाग घालून इलाज करत असे. ज्या व्यक्तीने अगोदर डॉक्टरकडून इलाज केला आहे किंवा त्याच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली आहे, अशा व्यक्ती त्याच्याकडे इलाज करण्यासाठी येत असत.

ShrutiWD
बुंदेलखंड-छतरपुर सारख्या मागासलेल्या भागात त्याच्या इलाजाची मोठी प्रसिद्धी झाली होती. त्यामुळे त्याच्याकडे येणार्‍या लोकांची रांग लागलेली असायची. नंतर बाबाने अडकित्त्याने लाकूड कापून देण्यास सुरवात केली आणि सांगू लागला की हे लाकूड आपल्याला प्रत्येक रोगापासून दूर ठेवेल.
ShrutiWD
हा बाबा अशा प्रकारचा इलाज गेल्या एक वर्षापासून करत होता. तो दररोज दीड तास आपले कुलदैवत असलेल्या नाग-नागिण जोडप्याची पूजा करत असल्याचा दावा करत असे. या पूजेत तो पाण्याचा उपयोग करत असे आणि ते पाणी प्यायल्यावर कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही अशी अफवा सगळीकडे पसरविण्यात आली होती.

बाबाने पसरविलेल्या या अफवेवर विश्वास ठेवून हजारो लोक गुरूवारच्या दिवशी पवित्र जल आणि अडकित्त्याने इलाज करण्यासाठी भर्रा गावी येत. हळूहळू बाबाची कीर्ती वाढत गेली आणि हजारोच्या संख्येने लोक बाबाकडे यायला लागले. वाढत्या लोकसंख्येमुळे गावकर्‍यांना त्रास व्हायला लागला म्हणून गावकर्‍यांनी बाबाला येथून निघून जाण्यासाठी सांगितले.

त्यावर बाबाने गाव सोडून जात असल्याचे सांगितले व या
ShrutiWD
गुरूवारी शेवटचा इलाज करतील अशी घोषणा केली. त्याच्या सहकार्‍यांनी या घोषणेचा प्रचार संपूर्ण परिसरात केला आणि गुरूवारच्या दिवशी भर्रा गावात लोकांची रांग लागली. शंभराच्या संख्येने येणार्‍या लोकांची संख्या हजारोच्या संख्येत गेली. या गर्दीला सांभाळण्यासाठी त्याच्या सहकार्‍यांनी काहीही व्यवस्था केलेली नव्हती.

एवढी मोठी गर्दी पाहून बाबा पण घाबरून गेला. कथित पाणी प्यायला देण्याऐवजी गर्दीवर पाणी फेकण्यास सुरवात केली. फेकलेले पाणी पिण्यासाठी गर्दीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा लोक मृत्यूमुखी आणि अनेकजण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी बाबाला अटक केली.

ShrutiWD
अटक केल्यानंतर बाबांचा सूर बदलला. आपल्याकडे चमत्कारीक शक्ती नाही असे सांगू लागला. आपल्याकडे लोक येतात ही त्यांची आपल्यावरील श्रद्धा आहे. एड्स आणि कॅन्सरसारख्या रोगांवर हमखास उपचार करतो, असा दावा करणारा बाबा आता आपल्याला त्यातले काही समजत नाही, असे सांगू लागला. अशा प्रकारचे भोंदू बाबा सर्व सामान्य लोकांना कशा प्रकारे फसवतात याचा विचार आपण केला पाहिजे.

या दुर्घटनेनंतर जेव्हा आम्ही गावकर्‍यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की बाबा इलाज आपल्या शेतात असलेल्या आश्रमात करीत असे. इलाज करण्यासाठी पैसे घेत नसे. परंतु, त्याच्या सहकार्‍यांनी शेतात दुकाने मांडली होती. या दुकानातून पूजेसाठी लागणारे सामान दुप्पट किमतीने विकले जात असे.

जर कुणाची इच्छा असेल तर बाबाला आपल्या इच्छेप्रमाणे
ShrutiWD
दान करत असे. या प्रकारे लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन बाबाने आपला धंदा तेजीत आणला होता... वाचकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या बाबांच्या जाळ्यात अडकू नका.

आमचा वाचक 'श्रद्धा आणि अंधश्रद्धा' यामधील फरक जाणतो असा आम्हाला विश्वास आहे. समाजात पसरलेल्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन फसविणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचे आम्ही व्रत हाती घेतले आहे. म्हणूनच दर मंगळवारी आम्ही अशा कथा आपल्यासमोर मांडत आहोत.