शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

एक गाव भूतांचे...

ज्‍यांच्‍यावर भूत, प्रेताची सावली आहे. किंवा भूताने झपाटलेल्‍या अनेक लोकांबद्दल आम्‍ही आतापर्यंत तुम्‍हाला सांगितलं असेल. मात्र आज आम्‍ही तुम्हाला अशा एका गावात नेणार आहोत. जिथे एक-दोन नव्‍हे संपूर्ण गावालाच भूतानं पछाडलेलं आहे.

मध्यप्रदेशातील खरगोन जिल्‍ह्याच्‍या गायबैड़ा नावाच्‍या गावातील पाच ग्रामस्‍थांना अचानक एका अज्ञात आजाराची लागण झाली आणि त्‍यात त्‍यांचा मृत्‍यू झाला. जेव्‍हा ग्रामस्‍थांना या आजाराचे कारण समजू शकले नाही. तेव्‍हा त्‍यांनी जवळच्‍या एका मांत्रिकाची मदत घेण्‍याचं ठरविलं. मांत्रिकाने सांगितलं, की गावावर एका भूताची वक्रदृष्‍टी आहे आणि त्‍यामुळेच लोक मरताहेत. मग ग्रामस्‍थांच्‍या आग्रहावर मांत्रिकाने भूत पळविण्‍यची योजना बनविली.

WD
मांत्रिकाच्‍या सांगण्‍यावरून अशी घोषणा केली गेली की गावाबाहेरून आलेल्‍या लोकांनी त्‍वरित गाव सोडून निघून जावे. आणि केवळ गावातील लोकांनीच गावात राहून भूत पळविण्‍यासाठी होणा-या पूजा-पाठ आणि यज्ञ कार्यात सहभागी व्‍हावे. या आदेशानुसार सर्व धार्मिक विधी पूर्ण केले गेले.

दरम्‍यान भूताला पळवून लावण्‍याचा दावा करणारा मांत्रिकाने भूत पळविण्‍यासाठीचे प्रयत्‍न सुरूच ठेवले. शेवटी संपूर्ण गावाच्‍या सीमेवर दूध टाकून सीमांकित केले गेले. यानंतर आता गावात भूत नसल्‍याचे मांत्रीकाने पटवून दिले.

WD
माणसाच्‍या आकलन शक्‍तीच्‍या पलीकडे गेलेल्‍या गोष्‍टीला तो चमत्‍कार, देव-देवता किंवा मग भूत-बाधा अशा संकल्‍पनांमध्‍ये बांधून ठेवत असल्‍याचे नेहमीच घडते. त्‍याच्‍या याच अज्ञानतेचा फायदा काही लोक उचलतात. आणि लोकांच्‍या भावनांना हात घालून त्‍यांची पिळवणूक करीत असतात. पदोपदी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करणा-या आजच्‍या या शिक्षित व्‍यवस्‍थेत भूताच्‍या गोष्‍टीवर विश्‍वास ठेवून मुर्ख बनणे कितपत योग्‍य वाटते? तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्‍हाला नक्‍की कळवा.