गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

मद्यपान करणारी देवी कंवलका

गायत्री शर्मा

श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या या भागात आम्ही आपल्याला एका अशा मंदिराचे दर्शन घडविणार आहोत की, जेथे देवाला नाहीतर देवीला प्रसाद म्हणून दारू अर्पण केली जाते. कालभैरवाला दारू देत असल्याचे ऐकण्यात होते. परंतु, एखाद्या देवीला दारूचा प्रसाद देण्याचे हे बहूधा पहिलेच उदाहरण असावे.

रतलाम शहरापासून सुमारे 32 किलोमीटरवर असलेल्या सातरूंडा गावातील एका उंच टेकडीवर कंवलका देवीचे मंदिर आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे मंदिर लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. या मंदिराचे विशेष म्हणजे, येथे कंवलका देवी, कालीदेवी आणि कालभैरव यांच्या मूर्ती दारू प्राशान करतात. भक्तगण देवीला प्रसन्न करण्यासाठी दारूचा नवस करतात. या मूर्त्यांच्या ओठाला दारूचा ग्लास टेकवला की, लगेच ग्लासातील दारू संपते आणि असे प्रत्यक्षात भक्तांसमोर झाले आहे.

मंदिराचे पुजारी पंडित अमृतगिरी गोस्वामी यांच्यामते, हे मंदिर सुमारे 300 वर्ष जूने असून मंदिरातील देवीची मूर्ती चमत्कारीक असल्याचे त्यांनी सांगितले. हे सत्य आहे की, ही मूर्ती दारू प्राशान करते.

दूर-दूरवरून श्रद्धाळू देवीचे चमत्कारीक रूप आणि नवस करण्यासाठी येतात. मुलगा झाल्यानंतर देवीच्या दर्शनाला आलेल्या रमेशने सांगितले की, देवीला प्रसन्न करण्यासाठी आम्ही बोकडाचा बळी दिला असून मुलाच्या डोक्यावरील केस देवी चरणी वाहून नवस पूर्ण केला आहे.

देवीचा प्रसाद म्हणून बाटलीत उरलेली दारू भक्तांना दिली जाते. आपला नवस पूर्ण झाल्यानंतर अनेक भक्त देवीच्या दर्शनाला अनवाणी तर बळी देतात.

हरियाली अमावस्या व नवरात्रीनिमित्त येथे यात्रा भरते. कुछ लोग बाहरी हवा व भूत-प्रेत से छुटकारा पाने के लिए भी माता के दरबार में अर्जी लगाते हैं

एखादी मूर्ती खरोखर मद्यपान करते का? की ही केवळ धारणा आहे? याबाबत काहीही सांगणे शक्‍य नसले तरीही आपल्‍याला काय वाटतं आम्‍हाला कळवा..