शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

महाआरतीने (म्हणे) दूर होते भूतबाधा

WD
भूतप्रेतांकडून केली जाणारी पूजा तुम्ही कधी पाहिलीय? मग चला आमच्याबरोबर. आम्ही तुम्हाला घेऊन जातोय मध्य प्रदेशातील बिजलपूर या गावातल्या दत्त मंदिरात. या मंदिरात होणार्‍या आरतीत भूतबाधा झालेल्या व्यक्ती सहभागी होतात आणि ते देवाची आरती करत असतानाच त्यांच्यातले भूत बाहेर काढले जाते.

हे मंदिर साधेच आहे. आम्ही गेलो त्यावेळी भाविक दत्त मूर्तीची पूजा करत होते. भूत काढण्याचा कार्यक्रम फक्त महाआरतीला होतो. एरवी कुठल्याही मंदिरासारखेच हे मंदिर असते. मंदिरातील दत्ताची मूर्ती देखणी आहे. महेश महाराज या मंदिराचे पुजारी आहेत. त्यांच्या मते हे मंदिर सातशे वर्ष जुने आहे. या मंदिराची सेवा आपल्या पूर्वी अनेक पिढ्यांनी केली. आपली सातवी पिढी असल्याचे ते सांगतात. या मंदिराच्या निर्मितीविषयीची कथाही महेश महाराजांनी सांगितली.

PTI
ते म्हणाले, की आमच्या घराण्यातील एक पूर्वज हरणुआ साहेब यांनी बारा वर्षे दत्ताची पूजा केली. त्यानंतर देवाने प्रसन्न होऊन वर माग असे सांगितले. त्यावर हरिणुआ साहेब यांनी दत्त महाराजांना या मंदिरातच वास्तव्य करण्यास सांगितले. येथे आलेले भाविक रिकाम्या हातांनी जाऊ नयेत अशी इच्छाही त्यांनी प्रकट केली. तेव्हापासून दत्ताचे येथे वास्तव्य आहे.

दत्ताच्या महाआरतीत सहभागी होणार्‍यांची सगळी दुःखे दूर होतात. भूतबाधा असेल तर तीही दूर होते, असा महेश महाराजांचा दावा आहे. म्हणूनच आम्ही उत्सुकतेने महाआरतीची वाट पाहू लागलो. लवकरच महाआरती सुरू झाली. हातावर जळता कापूर आणि पूजेचं ताट घेऊन भाविक पूजा करू लागले. पण काही वेळातच मंदिराचे दृश्य बदलले. काही लोक चित्रविचित्र हालचाली करू लागल्या, रडू-ओरडू लागले. महिला घुमू लागल्या. काही जणांनी जमिनीवर लोळण घेतली. या मंडळींच्या आत भूताचे अस्तित्व असल्याने ते अशा हालचाली करत असल्याचे सांगण्यात आले.

WD
या लोकांशी बोलल्यानंतर आम्हाला हा सगळाच प्रकार विचित्र वाटला. ही मंडळी भूतबाधेपेक्षा मानसिक आजाराने त्रस्त असावी असे आम्हाला वाटले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. योग्यवेळ‍ी उपचार झाला तरच ही मंडळी या त्रासातून मुक्त होऊ शकतील. या प्रकाराविषयी आपल्याला काय वाटते? आम्हाला जरूर कळवा.