शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

का नाही धुवूत मंगळवारी केस?

मंगळवारी आणि गुरुवारी केस न धुणे
अंधश्रद्धा- संकट येतं
 
तर्कशास्त्र- हे पाणी वाचण्यासाठी प्रयोगात आणलेला प्रकार होता

मंदिरात घंटा वाजवणे

अंधश्रद्धा- मंदिरात घंटा वाजवण्याने देव खूश होतात
 
तर्कशास्त्र- मंदिरात घंटा वाजवण्याने सकारात्मक वायब्रेशन निघतात ज्याने ध्यान लावण्यात मदत होते. हे शरीरात सात केंद्राने सक्रिय करण्यात मदत करतं.

दारात लिंबू मिरची लटकवणे
अंधश्रद्धा- याने वाईट नजरेपासून वाचतो
 
तर्कशास्त्र- लिंबू मिरचीत आढळणारे सायट्रिक एसिड जंतूनाशकासारखे काम करतात ज्याने घरात किडे येत नाही

बाहेर जाण्याआधी दही खाणे
अंधश्रद्धा- हे गुड लक मानले आहे
 
तर्कशास्त्र- भारतातील उष्णतेमुळे दही खाण्याने पोट थंड राहतं. दह्यात साखर टाकून खाल्ल्याने शरीरात ग्लूकोज वाढतं

स्मशानातून आल्यावर अंघोळ करणे
अंधश्रद्धा- याने मरणार्‍या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते
 
तर्कशास्त्र- आधी हिपॅटायटीस, स्मॉल पॉक्स सारख्या रोगांवर उपचार नव्हता. म्हणून अंतिम संस्कारानंतर अंघोळ करायचे ज्याने डेड बॉडीतील जर्म्समुळे रोग व्याधी व्हायला नको

सापाला मान मुरगळून मारणे
अंधश्रद्धा- सापाचे नातलगं त्याच्या डोळ्यात चेहरा बघून बदला घेऊ शकतो
 
तर्कशास्त्र- सापा डोक्याविनाही हल्ला करू शकतो म्हणून मान मुरगळणे आवश्यक आहे.  सापाचे रक्त थंड असल्यामुळे मरण्याच्या काही तासांनंतरही त्याचे अंग काम करतात

नदीत नाणे टाकणे
अंधश्रद्धा- भाग्यासाठी चांगले
 
तर्कशास्त्र- आधी नाणी तांब्याची असायची आणि तांबा पाण्यात राहिल्याने पाण्यातील जीवाणू नष्ट होतात. आधी लोकं नदी आणि तलावावर अंघोळीला जायचे आणि तांबा आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला असल्यामुळे ही परंपरा पडली

रात्री नख न कापणे
अंधश्रद्धा- आयुष्य घटतं
 
तर्कशास्त्र- रात्री वीज नसल्यामुळे रात्री नख कापताना हात कापला जाण्याची भीती असायची