शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By अरविंद शुक्ला|

कुत्र्याचे विष उतरवणारा नाला

WDWD
रस्त्यावरून चालत असताना एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला तर काय कराल? तुम्ही कदाचित डॉक्टरकडे जाल. पण काही लोक कुकरेलच्या गढूळ पाण्याच्या नाल्यात आंघोळ करतात. या नाल्यात आंघोळ केल्यामुळे म्हणे कुत्र्याचे विष शरीरात पसरत नाही. याला श्रद्धा म्हणायचे की अंधश्रद्धा!

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये हा नाला आहे. कुत्रा चावल्यावर कुकरेलच्या नाल्यात आंघोळ करण्याची प्रथा अनेक पिढ्यांपासून चालू आहे. लखनौ शहराच्या अगदी मधोमध असलेल्या लखनौ-फैजाबाद मार्गावर कुकरेल नाला आहे. येथे प्रत्येक रविवार आणि मंगळवारच्या दिवशी लोक आंघोळ करण्यासाठी येतात.

सामान्यांपासून अगदी लब्धप्रतिष्ठीतांपर्यंत सर्व लोक येथे हजेरी लावतात. या सर्वांना कुत्रा चावलेला असतो. कुत्र्याच्या विषापासून मुक्ती हाच उद्देश असतो. या नाल्यात अनेक प्रशासकीय अधिकार्‍यांनीही आंघोळ केली असल्याचे नाल्याशेजारी राहणार्‍या लोकांनी सांगितले. या नाल्यात आंघोळ केल्यामुळे कुत्र्याचे विष शरीरात पसरत नाही असे मानले जाते.

तिथे गेल्यावर असे दिसले की एक गढूळ पाण्याचा घा
WDWD
नाला वाहत आहे. नाल्याच्या एकाबाजूला अतिक्रमण करून झोपडपट्टी आणि पक्की घरे बांधली आहेत. दुसर्‍या बाजूला नाल्याचा बांध आहे. हा नाला शहरापासून 20 ते 30 किलोमीटरवर असलेल्या बक्ष‍ी तलावापासून सुरू होऊन पुढे अस्ती गावातून भैसाकुंडच्या गोमती बंधाऱ्याला जाऊन मिळतो.

कुत्रा चावलेले रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक येथे सकाळपासूनच गर्दी करतात. आंघोळ करून आल्यावर रूग्णावर झाडफुकीचा इलाज केला जातो. गुळाची फुंक मारून उपचार केला जातो. या पुलावर झाडफुकीच्या उपचारासाठी रविवारी आणि मंगळवारी संजय जोशी, नोंदर जोशी आणि नूरजहॉं उपस्थित असतात.

याबाबत संजय जोशी यांना विचारले असता, त्याने सांगितले की त्यांचा हा व्यवसाय पिढीजात असून गेल्या चार पिढ्यापासून हा व्यवसाय चालू आहे. संजय शहरातील मनकामेश्वर मंदिराजवळील जोशी टोला येथील रहिवासी असून त्याच्याजवळ चार पिढ्या जुना एक पंजासारखा लोखंडाचा तुकडा आहे. तो तुकडा कुत्रा चावलेल्या व्यक्तीच्या जखमेवर ठेवून झाडफुक मारून मंत्र म्हटला जातो. त्याला मंत्राविषयी विचारले असता मंत्र सांगण्यास नकार दिला. पण हा भैरवाचा मं‍त्र असल्याचे त्याने सांगितले.

रविवारी आणि मंगळवारी येथे रूग्णांची गर्दी उसळलेली असते. मानपूर लाल येथील पाच वर्षीय विशाल आपले वडील प्रदीप कुम्हार यांच्या बरोबर कुकरेल नाल्यात स्नान करण्यासाठी येतो. विशालच्या वडिलांना पूर्ण विश्वास आहे, की या नाल्यात आंघोळ केल्यावर त्यांच्या मुलाला रेबिजचे इंजक्शन देण्याची आवश्यकता नाही.

WDWD
विशालचे ऐकत असतानाच कुत्रा चावलेला मोहम्मद शाहिद (वय-11) वडील मोहम्मद अब्दुल रहमान (रा. रजनी खंड, सेक्टर- 8, शारदानगर, रायबरेली मार्ग लखनौ) यांच्याबरोबर नाल्यात आंघोळीसाठी आले होते. मोहम्मद अब्दुल रहमान यांनी सांगितले, की त्यांनाही नऊ वर्षापूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता. तेव्हा त्यांनी डॉक्टरांकडे न दाखवता कुकरेलच्या या नाल्यात आंघोळ केली होती. त्यानंतर त्यांना आजपर्यंत रेबिज झाला नाही.
WDWD
या लोकांप्रमाणेच अंकुर (रा. महिबुल्लापुर) हा आपले वडील मुन्नालाल गुप्ता यांच्याबरोबर या नाल्यात आंघोळ करण्यासाठी आला होता. अंकुरनेही कुत्रा चावल्यानंतर रेबिजचे इंजेक्शन घेतले नाही. कारण त्याच्या वडीलांचा विश्वास आहे की कुकरेलच्या नाल्यात आंघोळ केल्यावर त्याला काहीच होणार नाही. ते सांगतात, की तीस वर्षापूर्वी त्यांच्या भावाला कु्त्रा चावला होता. त्यानेही कुकरेलच्या या नाल्यात आंघोळ केली होती. त्याला अजूनपर्यंत काहीही झाले नाही.

प्रचलित समजूत
शक्तीनगर येथील (घर. नं. एस-148) येथील रहिवासी आणि लखनौ उच्च न्यायालय खंडपीठाचे डेप्युटी रजिस्टार म्हणून निवृत्त झालेले सी. एन. सिंह यांनी कुकरेलच्या नाल्याविषयी एक कथा सांगितली. अफगाणिस्तानचा एक व्यापारी आपल्या कुत्र्याबरोबर येथे व्यापार करण्यासाठी आला होता. इथे येईपर्यंत त्याचे पैसे संपून गेले होते.

त्याने येथील एका जमीनदाराकडून उधार पैसे घेतले आणि
WDWD
त्याबदल्यात आपल्याजवळील कुत्रा दिला आणि म्हणाला की जेव्हा मी पैसे परत करील तेव्हा माझा कुत्रा मी घेऊन जाईल. अनेक दिवस उलटून गेले तरी व्यापारी आला नाही. याचदरम्यान जमीनदाराच्या घरी चोरी झाली. घरातील माल घेऊन चाललेल्या चोराला कुत्रा पाहत होता.

योगायोगाने चोराने तो माल एका विहीरीत टाकला. कुत्रा जमीनदाराला इशार्‍याने विहिरीजवळ घेऊन गेला आणि चोरीचा सर्व माल पुन्हा मिळाला. जमीनदार प्रसन्न झाला आणि त्याने कुत्र्याला मुक्त केले.

WDWD
अचानक तो व्यापारी आला आणि त्याने कुत्रा मागितला. तो तिथे नव्हता. व्यापारी निराश होऊन जात असताना अचानक रस्त्यात त्याला तो कुत्रा मिळाला. त्याने नाराजीने कुत्र्याला म्हटले, तू मला धोका दिला आहेस. त्या विहीरीत जाऊन मर! कुत्र्याने मालकाचे म्हणणे ऐकले आणि विहीरीत उडी मारून आपला जीव दिला. कुत्र्याने पाण्यात उडी मारल्यावर विहीरीच्या पाण्याला उकळी फुटली होती आणि तेथूनच हा नाला सुरू झाला असे सांगितले जाते.

व्यापारी पश्चातापाने रडू लागला तेव्हा मृत कु्त्र्याने त्याला सांगितले की एखाद्या कुत्र्याने चावा घेतल्यावर जी व्यक्ती या पाण्यात आंघोळ करेल त्याला त्या कुत्र्याचे विष चढणार नाही.

अखेर खरे काय?
राजधानीतील डॉक्टर हेरंब अग्निहोत्री यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या उपचाराला कोणताच शास्त्रीय आधार नाही. कारण कुत्रा चावल्यावर 'रेबीज' नावाचा रोग व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस गुडघ्यापासून मस्तकात जाऊन घर करतो. रेबीजची लक्षणे एक महिन्यानंतर दिसून येतात. तर कधी कधी दहा वर्षानंतरही लक्षणे प्रकट होऊ शकतात.

रेबीज प्रतिरोधक इंजेक्शन महाग असून ते गरीबाला
WDWD
परवडणारे नाही. म्हणून अशा प्रकारचा सोपा मार्ग निवडला जातो असेही त्यांनी सांगितले.
परंतु, हे इंजेक्शन आता सरकारी रूग्णालयात कमी दरात उपलब्ध आहे. कुत्रा चावल्यावर डॉक्टर रूग्णाला त्वरीत आंघोळ करण्याचा सल्ला देतात पण घाण पाण्याने नाही तर स्वच्छ पाण्याने करावी. या नाल्यात एखादे टॉक्सीन असेल ज्यामुळे रेबीज व्हायरस मरून जात असेल असा संशय त्यांनी व्यक्त केला.