मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By अय्यनाथन्|

झाडाच्या पानांच्या आधारे भविष्यकथन

WDWD
आपल्या देशात भविष्य पाहण्याच्या विविध पद्धती आहेत. हात पाहून, संख्यांच्या आधारे, नक्षत्रांच्या आधारे असे वेगवेगळ्या पद्धतीने भविष्य पाहिले जाते. पण अंगठ्याच्या ठशाच्या आधारे भविष्य पाहता येते, याची तुम्हाला कल्पना आहे? असे भविष्य पाहण्याची पद्धत तमिळनाडूमध्ये शेकडो वर्षांपासून सुरू आहे. त्याला 'नाडी ज्योतिदाम' असे म्हणतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या पुसट रेषेवरच भविष्यकथनाची ही पद्धत आहे. तमिळनाडूतील शंकराचे पवित्र क्षेत्र असलेले वैथीस्वरन कोईल हे ठिकाण अंगठ्यावरून भविष्य पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे.

गावात प्रवेश केला की स्वागताचे शेकडो बोर्ड दिसून येतात. अंगठ्यावरून भविष्य पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे स्वागत असे त्यावर लिहिलेले आहे. केवळ तमिळनाडूच नाही, तर इतर राज्यांतील अगदी परदेशातील लोकही येथे स्वामी वैथीस्वरा यांच्या दर्शनासाठी आणि आपल्या भविष्याच्या गर्भात काय आहे हे पाहण्यासाठी येथे येत असतात.

आम्ही नाडी ज्योतिदार के. व्ही. बाबूस्वामी यांची भे
WDWD
घेतली. त्यांनी नाडी ज्योतिषाविषयी माहिती सांगितली. ते म्हणाले, की अगस्ती ऋषींनी दोन हजार वर्षांपूर्वी ही ज्योतिष पद्धती शोधून काढली. त्यांच्यानंतर कौशिकऋषी आणि शिव वाकियार यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. या पद्धतीत पुरूषाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा आणि स्त्रीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेतला जातो.

त्यानंतर त्यांच्याकडे असले्या पाम झाडाच्या पानांच्या आधारे ते त्या व्यक्तीचे नाव, जोडीदाराचे नाव, आई, वडिल, बहिण, भाऊ यांची नावे सांगतात. भाऊ, बहिण किती आहेत हेही सांगतात. याशिवाय त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे. त्यांचे शिक्षण किती याशिवाय इतर काही बाबीही अगदी अचूक सांगितल्या जातात. हे अगदी बरोबर सांगितल्यावर ते संबंधित व्यक्तीला त्याच्या भविष्यात काय दडले आहे, ते सांगतात.

बाबूस्वामी सांगतात, मनुष्यप्राणाच्या अंगठ्याच्या ठशाचे १०८ प्रकार असतात. या प्रकारातही काही बदल असल्याने काही उपप्रकारही असतात. त्या माणसाचे भविष्य सांगण्यसाठी अंगठ्याचा ठसा अगदी योग्य असावा लागतो. कारण माणसागणिक ठसा वेगळा असतो. त्यामुळे ठसा थोडा जरी चुकला तरी ते आपली जी नावे सागंतात, ती जुळत नाहीत. हे भविष्यवेत्ते अंगठ्यावरून पाम झाडाच्या पानांचा गठ्ठा उचलतात. त्यावरून ते त्या व्यक्तीच्या आयुष्याशी जुळणारे पान शोधून काढतात. त्यासाठी सहाजिकच त्यांना काही प्रश्न विचारावे लागतात.

WDWD
झाडाच्या पानावर माणसाचे भविष्य लिहिलेले असते काय असा प्रश्न पडतो. हे जाणून घेण्यासाठी आमच्यापैकी एकाने आपल्या अंगठ्याचा ठसा दिला. त्याचा आकार शंखाच्या आकाराचा आहे, असे बाबूस्वामी यांनी सांगितले. त्यानंतर झाडाची पाने ठेवलेल्या खोलीत ते गेले. तेथून थोड्या वेळाने ते एक पानांचा गठ्ठा घेऊन आले. त्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले. त्यांची उत्तरे होय किंवा नाही एवढीच द्यायची असे त्यांनी सांगितले होते.
WDWD
पहिल्या प्रश्नाला नाही असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर बाबूस्वामींनी दुसरे पान उचलले आणि दुसरा प्रश्न विचारला. पुन्हा नाही असे उत्तर आले. त्यानंतर अशी दहा पाने उचलली. प्रत्येक प्रश्नाला नाही हेच उत्तर होते. आश्चर्य म्हणजे त्यांनी उचललेल्या अकराव्या पानावरून त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आली.

त्यांनी विचारले, ' तुम्ही द्विपदवीधर आहात का?'
उत्तर आले, होय
'तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात रहात आहात'
'होय'
तुम्हाला कोणताही रोग नाही?
'होय'
तुमची पत्नी घरकाम करते. नोकरी नाही.
होय''
तुम्ही व तुमच्या वडिलांचा एकदाच विवाह झाला आहे.
'होय'

या व्यतिरिक्त आणखी दोन प्रश्न विचारले. त्यांची उत्तरेह
WDWD
होकारार्थी आली. पण तुमची मुलगी परदेशात शिकते का? या प्रश्नाचे उत्तर मात्र नकारार्थी आली. त्यानंतर त्यांनी हातातली पाने बाजूला ठेवली. त्यानंतर त्यांनी आणखी नऊ पानांच्या आधारे प्रश्न विचारले. पण त्यांची उत्तरेही नकारार्थी आली. त्यानंतर बाबूस्वामी आत गेले. पण थोड्याच वेळात रिकाम्या हातांनी बाहेर आले. त्यांच्या चेहर्‍यावरच दिसत होते. त्यांच्याकडे आमचे 'भविष्य' नव्हते. पण सारवासारव करत ते म्हणाले, आजचा दिवस तुमचा नाहीये.

तुम्ही खरोखरच भविष्य जाणून घेण्याच्या इराद्याने या. तरच तुमचे भविष्य सांगणारे पान सापडेल. अन्यथा नाही. कारण पान सापडणे किंवा न सापडणे हेही तुमचे नशीबच आहे.''

हे सगळे झाल्यानंतर आम्ही त्यांना किती पैसे द्यायचे असे विचारल्यावर त्यांनी 'काहीही नाही' असे सांगून, 'आम्ही एखाद्याचे सर्व भविष्य सांगितल्यावरच पैसे घेतो. अन्यथा नाही. हा आमचा नियम आहे, असे स्पष्ट शब्दात सांगितले. हे सांगितल्यावर आम्हीही आश्चर्यचकीत झालो. म्हणजे भविष्यकथन हा त्यांचा पोट भरण्याचा व्यवसाय नव्हता. जगात लाखो, करोडो लोक आहेत. त्या सर्वांची भविष्ये येथे झाडाच्या पानांवर ऋषीमुनींनी लिहून ठेवली आहेत, असे येथील भविष्यवेत्त्यांचे म्हणणे आहे.

WDWD
त्यावर विश्वास ठेवून लोकही येथे येत असतात. आपले भविष्य जाणून घेतात. भविष्य, पुनर्जन्म या सगळ्या विज्ञानासाठी भाकडकथा आहेत. पण सामान्यजन यावर विश्वास ठेवतात. पण तुमचे काय? तुमचा यावर विश्वास बसतोय? झाडाच्या पानावर भविष्य असते असे तुम्हाला वाटते? मग लिहा तुमचे मत खाली फिडबॅक फॉर्ममध्ये.