शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

नारळाचे 10 अद्भुत टोटके

कर्ज फेडण्यासाठी: एका रेषेदार नारळावर जाईचे तेल मिसळलेल्या शेंदुराने स्वस्तिक मांडावे. नैवेद्यासह (लाडू किंवा चणे-गूळ) हे हनुमंतच्या मंदिरात जाऊन त्यांच्या पायात अर्पण करून ऋणमोचक मंगल स्तोत्रपाठ करावे. लाभ मिळेल.
किंवा शनिवारी सकाळी नित्यकर्म व स्नान केल्यानंतर आपल्या लांबीनुसार काळा दोरा एका रेषेदार नाराळाला वळून याचे पूजन करा. याला वाहत्या पाण्यात प्रवाहीत करा. देवाला कर्ज मुक्तीची प्रार्थना करा.
 

व्यवसायात फायद्यासाठी: व्यवसायात नुकसान होत असल्यास गुरुवारी सव्वा मीटर पिवळ्या वस्त्रात एक रेषेदार नारळ ठेवून एक जोड जानवे, सव्वा पाव मिठाईसह विष्णू मंदिरात संकल्प घेऊन चढवावे.

धन साठवण्यासाठी: आर्थिक संकट दूर करण्यासाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या मंदिरात एक रेषेदार नारळ, गुलाब, कमळाच्या फुलांची माळ, सव्वा मीटर गुलाबी, पांढरा कापड, सव्वा पाव जाई, दही, पांढरी मिठाई, एक जोड जानव्यासह अर्पण करावे. यानंतर देवी आईची कापूर आणि शुद्ध तुपाने आरती करावी व श्रीकनकधारा स्तोत्र जपावे.

कालसर्प किंवा शनी दोष हेतू: शनी, राहू किंवा केतू संबंधित समस्या असेल, कामात काही अज्ञात अडथळे येत असल्यास, नकळत भीती किंवा आपल्याला कुटुंबाला कोणी बांधले असे वाटत असल्यास शनिवारी एक पाणीदार नारळ काळ्या कापड्यात ठेवावे. 100 ग्राम काळे तीळ, 100 ग्राम उडदाची डाळ आणि 1 खिळ्यासोबत वाहत्या पाण्यात प्रवाहीत करून द्यावे.

 
ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल किंवा राहू-केतू अशुभ फल देत असतील त्यांनी कोरडे रेषेदार नारळ किंवा काळा- पांढर्‍या रंगाची घोंगडी दान करावी.

यश प्राप्तीसाठी: खूप प्रयत्न केल्यानंतरही कामाला यश मिळत नसेल तर आपण एक लाल सुती कापड घेऊन त्यात रेषेदार नारळ गुंडाळून वाहत्या पाण्यात प्रवाहीत करावेमनात सात वेळा आपली मनोकामना उच्चारून हे नारळ प्रवाहीत करावे.

 

रोग किंवा संकट दूर करण्यासाठी: एक साबूत पाणीदार नारळ स्वतः:वरून 21 वेळा ओवाळून देवस्थळी अग्नीत स्वाहा करून द्या. हा उपाय मंगळवारी किंवा शनिवारी करावा. पाच वेळा हा उपाय केल्याने लाभ मिळेल. याव्यतिरिक्त मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पाठ करून चोला चढवावा.

स्थायी नोकरीसाठी: नारळाच्या रेषा जाळून भस्म तयार करावी त्यात नारळाचे पाणी मिळून मिश्रण तयार करावे. ह्या मिश्रणाचे सात पॅकेट तयार करावे. त्यातून चार पुड्या घरातील चार कोपर्‍यात ठेवाव्या. एक पुडी गच्चीवर, एक पिंपळाच्या मुळात आणि स्वतः:च्या खिशात ठेवावी. यावर कोणाची वाईट नजर किंवा वाईट सावली पडता कामा नये.


सात दिवसांनंतर या सर्व पुड्या एकत्र कराव्या. त्यातून एक पुडी तिथे ठेवावी जिथून आपल्या कमाई करायची आहे किंवा नोकरी करायची आहे. ती पुडी दाराच्या एखाद्या कोपर्‍यात लपवून ठेवावी.  तरी हा टोटका एखाद्या अनुभवी व्यक्तीला विचाररून अमलात आणावा.

शनी संकटापासून मुक्तीसाठी: सात शनिवारी एखाद्या नदीत नारळ प्रवाहीत करावे. सतत सात शनिवारी हे करावे. यात नागा नको. नारळ प्रवाहीत करताना या मंत्राचा जप करावा- ॐ रामदूताय नम:।
 

गरिबीवर मात करण्यासाठी: दर शुक्रवारी सकाळी श्रीगणेश आणि महालक्ष्मीचे पूजन करावे. पूजेत एक नारळ ठेवावे. पूजा झाल्यावर ते नारळ तिजोरीत ठेवावे. रात्री हे नारळ काढून प्रार्थना करत गणपती मंदिरात अर्पण करावे. किमान 5 शुक्रवारी हा नियम पाळावा.

आयुष्यभर भरभराटीसाठी: दिवाळीच्या दिवशी गणपती आणि महालक्ष्मीची चौरंगावर विधिपूर्वक स्थापना करावी. पूजा स्थळी तांदुळाच्या ढिगावर तांब्याचे कळश ठेवून त्यात लाल रंगाच्या वस्त्रात नारळ गुंडाळून ठेवावे. नारळ असे ठेवावे की त्याचे अग्र भाग दिसले पाहिजे. अता दोन मोठे दिवे लावावे. त्यात एक दिवा तेलाचा तर दुसरा तुपाचा असला पाहिजे. एक दिवा चौरंगाच्या उजवीकडे तर दुसरा मूर्तीच्या पायाशी ठेवावा. याव्यतिरिक्त एक दिवा गणपतीजवळ ठेवावा. यानंतर विधिपूर्वक पूजन करावे.