गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

महाकालेश्वर येथील उंच वाढणारे शिवलिंग

देवास येथील महाकालेश्वर मंदिर

ShrutiWD
चमत्कार खरा असतो का? या प्रश्नाचे उत्तरे देणे अवघड आहे. पण चमत्कारावर विश्वास ठेवणार्‍यांची संख्या खूप मोठी असते. प्रत्येक धर्मात चमत्कार आढळतात. कधी ते देवाने तर कधी संतांनी केलेले. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या लेख मालिकेत आपण एका मंदिराशी निगडीत चमत्काराविषयी जाणून घेणार आहोत. हा चमत्कार ही अंधश्रद्धा हे आपण ठऱवायचे आहे.

देवास येथील महाकालेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. येथील शिवलिंग स्वयंभू असून प्रत्येक वर्षी या लिंगाची उंची आपोआप वाढते, असे मंदिराच्या आसपास राहणारे लोक आणि नियमित दर्शनाला येणार्‍या भाविकांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात अधिक माहिती घेण्‍यासाठी आम्ही मंदिराती
ShrutiWD
लोकांशी संपर्क साधला असता पुढील माहिती मिळाली.मंदिरात पोहचले तेव्हा काही लोक शिवभक्तीत तल्लीन झाले होते. या मंदिरात मागितलेली मनोकामना पूर्ण होते अशी लोकांची श्रद्धा आहे. मंदिरातील लिंग उज्जैन येथील महाकाल शिवलिंगाप्रमाणे दिसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उज्जैनचे महाकाल शिवलिंग क्षरण होत असल्याने घटत चालले आहे, तर येथील शिवलिंग प्रत्येक वर्षी वाढत असल्याचा दावा येथील लोक करतात.

मंदिराजवळ राहणारे राधाकृ्‍ष्ण मालवीय लहानपणापासून या लिंगाची पूजा करत आहेत. या लिंगाचा आकार वाढत असल्याचे त्यांनी पाहिले आहे. शिवरात्रीच्या ‍दिवशी या शिवलिंगाची तीळभर उंची वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.

ShrutiWD
शिवलिंगाची उंची वाढत असल्याची बाब सुरवातीला कुणालाही माहित नव्हती. चार-पाच वर्षांनंतर सर्वांनीच त्यावर विश्वास ठेवला आहे. आत‍ा ही उंची बरीच वाढली आहे. हे शिवलिंग स्वयंभू असण्यामागे एक कथा आहे. शंभर वर्षांपूर्वी देवास छोटेसे गाव होते. प्रवासासाठी वाहतुकीची सुविधाही उपलब्ध नव्हती. त्याकाळी गौरीशंकर पंडीत नावाची एक व्यक्ती महाकालेश्वराची भक्त होती. ते दररोज सकाळी महाकालचे दर्शन केल्यावरच अन्नग्रहण करीत असत.
ShrutiWD
एकदा मुसळधार पाऊस झाल्यामुळे देवास-उज्जैन रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्यामुळे गौरीशंकर महाकालचे दर्शन करण्यासाठी जाऊ शकले नाहीत. आपल्या आराध्यदैवताचे दर्शन न झाल्यामुळे त्याने अन्नपाणी सोडून दिले. तरीही पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता आणि गौरी‍शंकर जीवनाचे अंतिम क्षण मोजत होते. त्यांचा मृत्यू होणार एवढ्यात भोलेनाथाने त्याला दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. त्याने प्रभूला नियमित दर्शनाचा वर मागितला. यावर शंकराने त्याला सांगितले, की तू कुठेही पाच बेलपत्रे ठेवलीस तेथे मी तुझ्या दर्शनासाठी प्रकट होईन.

यानंतर देवासच्या या टेकडीवर शिवशंकर प्रकट झाले. गावकर्‍यांनी येथे मंदिर बांधले. हे मंदिर लवकरच भाविकांचे श्रद्धास्थान बनले. काही वर्षांनंतर हे शिवलिंग वाढत असल्याचे लक्षात आले. या मंदिराच्या सेवा समितीचे सदस्य भीमसिंह पटेल यांनी सांगितले की, ते अनेक वर्षापासून या मंदिराच्या सेवा समितीत काम करतात.

या दरम्यान त्यांनी स्वत: या शिवलिंगाची उंची
WD
वाढताना बघितली आहे. आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी शिवलिंगाचे जुने छायाचित्र दाखविले. त्या छायाचित्रातील शिवलिंग आतापेक्षा लहान वाटते. येथील शिवलिंगाचा आकार वाढत आहे. पण छायाचित्र हा त्याचा पुरावा होऊ शकत नाही. तरीही एक तीळ एवढा लहान असतो की त्याआधारे मोजमाप करता येऊ शकत नाही. भूगर्भातील हालचालीमुळे शिवलिंगात थोडीशी वाढ होवू शकते असे वैज्ञानिकांचे मत आहे. अशाच प्रकारच्या प्रक्रियेमुळे समतल भूपृष्ठावरही काही वर्षानंतर टेकडी निर्माण होऊ शकते.