गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By श्रुति अग्रवाल|

स्नानाने (म्हणे) बरा होतो पक्षाघात

ShrutiWD
मध्य प्रदेशातील भादवा माता संस्थान म्हणजे रहस्याची अजब दुनिया आहे. येथील पाण्याने अंघोळ केल्यास म्हणे पक्षाघात बरा होतो. यामागे रहस्य तरी काय असा विचार करून मध्यप्रदेशातील नीमच शहरापासून पन्नास किलोमीटर असलेल्या भादवा माता मंदिरात जाऊन पोहचले. मंदिराच्या दोन्ही बाजूने पूजा साहित्य विक्रीची दुकाने आहेत. पुढे काही अंतरावरच मंदिर आहे. येथे आमचे स्वागत केले मंदिराचे व्यवस्थापक विश्वनाथ गेहलोत यांनी. त्यांच्याशी बोलत असतानाच मंदिराविषयी बरीच माहिती मिळाली.

फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भादवा माता ही भिल्लांची कुलदेवता आहे आणि याच जातीतील व्यक्ती येथील पुजारी असतो, गेहलोतांनी सांगितले. पक्षाघात बरा करण्याबाबत असलेल्या ख्यातीबाबत त्यांना विचारले, असता त्यांनी होकारार्थी मान हलवली. येथे चमत्कार होतात, असे त्यांनी सांगितले.

ShrutiWD
येथील मंदिर व पाण्याची विहीर खूप प्राचीन आहे. या विहिरीतील पाण्याने स्नान केल्यास पक्षाघाताच्या रूग्णांना फायदा होतो, असे सांगितले जाते. नवरात्रातील यात्रेदरम्यान येथे खूप गर्दी असते. गर्दी जास्त होत असल्याने प्रशासनाने टाकी बांधली आहे. गेल्या वीस वर्षांपासून विहिरीत स्नान करण्यास मनाई करण्यात आली आहे. विहिरीतील पाण्याने टाकी भरण्यात येते. हे पाणी स्नानासाठी वापरण्यात येते. महिला व पुरुषासाठी स्वतंत्र स्नानगृहही बांधण्यात आले आहे. रूग्ण व सामान्य भाविकही येथेच स्नान करतात.

आपल्याला काय वाटत भादवा मातेच्या आवारात असलेल्या पाण्यात आंघोळ करणे म्हणजे... यावर आपले मत नोंदवा
ShrutiWD
या पाण्याबाबत असलेल्या कीर्तीबाबत काही भाविकांशी संवाद साधला. रतलामचे अंबारामजी येथे दुसर्यांदा आले होते. ते म्हणाले, '' तीन वर्षापूर्वी पक्षाघात आला होता. तेव्हा येथे आलो होतो. तीन वर्षात स्वतःच्या पायावर आता चालू शकतो. दुसर्यांदा येथे आलो. त्यामुळे आता निश्चितच पूर्णपणे बरा होईन'. राजस्थानाहून आलेला अशोक पाच दिवसांपूर्वी येथे आला. त्याच्या शरीराचा डावा भाग पूर्णपणे निकामी झालेला होता. येथे आल्यानंतर तो काठीच्या साहाय्याने चालायला लागला. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने कुटुंबीय खूश आहेत.

ShrutiWD
काही वर्षांपूर्वी संशोधकांनी येथील पाण्याचे परीक्षण केले होते. येथील पाण्यात रक्ताभिसरण वाढवणारे घटक आहेत, अशी माहिती येथील दुकानदार राधेश्याम शर्मा यांनी दिली. तोपर्यंत पुजार्यांचे आगमन झाले. राधेश्याम भिल्ल हे येथील पुजारी. गेल्या अनेक वर्षांपासून ते येथील पूजाअर्चा करत आहेत. शनिवार व रविवारी रात्री देवीची पालखी निघते. देवी मंदिरास प्रदक्षिणा घालून उपस्थित रूग्णांची व्याधी दूर करते, अशी श्रद्धा आहे. यामुळे भाविक मंदिराच्या परिसरातच रात्र घालवतात. येथे बोकड व कोंबडा बळी देण्याचीही प्रथा आहे. येथे सकाळ व संध्याकाळी होत असलेली आरती महत्त्वाची असते. रूग्ण चालण्यास असहाय असले तरी या वेळी तो देवीसमोर आल्याशिवाय (किंवा आणल्याशिवाय) राहत नाही.
ShrutiWD
येथील पाण्याचे अजूनपर्यंत शास्त्रीय परीक्षण झालेले नाही. फक्त येथील विहीरच नाही, तर जवळपासच्या विहिरींचे पाणीही विशेष असल्याचे मानले जाते. उन्हाळ्यात हे पाणी आटल्यानंतर बाजूच्या विहिरीतील पाणी तीत टाकण्यात येते. या पाण्याचाही रूग्णांवर सकारात्मक परिणाम होतो, अशी श्रद्धा आहे. येथे स्नान केल्याने बरा झाल्याचा दावा करणारे बरेच भेटतात, पण काहींवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही, हेही तितकेच खरे आहे. देवी मातेस श्रद्धापूर्वक विनंती केल्यास ती भक्तांच्या इच्छा पूर्ण करते, अशी बहुतेकांची श्रद्धा आहे.

परंपरा-
ShrutiWD
भादवा मातेचे हे मंदिर आठशे वर्ष पूर्वीचे आहे. येथील मूर्तीसुद्धा खूप जुन्या आहेत. दर्शनाअगोदर विहिरीतील पाण्याने स्नान करण्याची परंपराही तेवढीच जुनी आहे. येथील पाण्याने स्नान केल्यास पक्षाघाताचा रूग्ण बरा होत असल्याचे काहींच्या लक्षात आले. कालांतराने ही गोष्ट सर्वज्ञात झाली. यासोबतच मंदिरात भाविकांच्या रांगा लागायला लागल्या. शासनाने याकडे लक्ष वेधण्यात आल्यावर पाण्याची टाकी बांधण्यात आली. दरवर्षी दोन्ही नवरात्रात येथे यात्रा भरते.

वाचनवीकथप्रत्येमंगळवारी....