शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 29 जुलै 2016 (10:28 IST)

आज संप; बँका 3 दिवस सलग बंद

देशभरातील बँकांचा आज एकदिवसीय संप आहे. त्यामुळे शनिवार, रविवार पकडून 3 दिवस सलग बँका बंद असणार आहेत. केंद्र सरकार बँकिग क्षेत्रात करत असलेल्या विविध बदलांना विरोध म्हणून आज संप आहे.

या बंदमध्ये स्टेट बँकेसह १० लाख बँक कर्मचारी सहभागी होणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचं विलनीकरण आणि आयडीबीआय बँकेचं खाजगीकरण या आणि इतर कारणांसाठी बँकांचा आज संप असणार आहे. या संपामुळे बँकांच्या चेक क्लिअरन्स, पैसे भरणे, पैसे काढणे यासारख्या कामकाजावर परिणाम होईल.