गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By wd|
Last Modified: नाशिक , शनिवार, 21 जून 2014 (10:52 IST)

कांदा यंदाही रडवणार!

कांदा यंदाही रडवणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. येत्या ऑक्टोबरपर्यंत कांद्याचे दर 100 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकारच्या काळात अच्छे दिनांची आतुरतेने वाट पाहणार्‍या जनतेला आता बुरे दिन येत असल्याचे दिसत आहे. मोदी सरकारने नुकतीच रेल्वेच्या प्रवाशी भाड्यात 14.2 टक्क्याने वाढ केली आहे. तसेच मालवाहतुकीच्या भाड्यात 6.5 टक्कयाने वाढ केली आहे. त्यामुळे ज्या वस्तूची वाहतूक रेल्वेने केली जाते त्या वस्तूचे दर वाढणार आहेत.

ऑक्टोबरमध्ये कांदा 100 रुपये प्रतिकिलो  दराने खरेदी करावा लागण्याची शक्यता आहे. दिल्लीत कांद्याचा प्रतिकिलो भाव 25 रुपयांच्या घरात आहे. मागील आठवड्यात दिल्लीत 15 रुपये कांद्यांचा भाव होता.

वाणिज्य मंत्रालयाच्या मते, कांदा निर्यातीला आळा बसावा. तसेच  देशातील कांद्याच्या ‍किंमतीतील तेजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावर टनामागे 300 डॉलर किमान निर्यात मुल्य लावण्यात आले आहे.