बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वार्ता|

पतंनगरमधून बाहेर पडणार नॅनो

टाटा मोटर्सने गुजरातमध्ये नॅनो प्रकल्प स्थापण्याची घोषणा केली असली तरी उत्तराखंडातील पतंगनगर येथील टाटांच्या प्रकल्पातून पहिली नॅनो कार बाहेर पडणार हे निश्चित मानले जात आहे.

राज्याचे मुख्य सचिव इंदू कुमार पांडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नॅनोने जरी गुजरातमध्ये प्लँट स्थापन केला असला तरी उत्तराखंडातूनच पहिली नॅनो रस्त्यावर धावेल असे पांडे म्हणाले.

उद्योगांना आकर्षीत करण्यासाठी राज्य सरकारने नवीन रणनिती आखली असून, अनेक उद्योग राज्यात येण्यास उत्सुक असल्याचे ते म्हणाले.