शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|

मुडीज भारतावर खूश

जागतिक स्तरावरील पतमापन संस्था मुडीजने भारताला स्थिर पतमापनाचा दर्जा दिला आहे. वेगाने होणारा आर्थिक विकास, बचत तसेच गुंतवणूक दरातील सातत्या यामुळे भारताला बीएएए 3 स्थिर हे पतमापन दिले जात असल्याचे मुडीजने म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी अनेक पतमापन संस्थांनी भारताचे रेटिंग घटविले होते. मात्र मुडीजने स्थिर पतमापनाचा दर्जा दिल्यानंतर कित्येक दिवसांत ‍पहिल्यांदाच शेअर बाजाराचा निर्देशांक मोठी वाढ घेत बंद झला.