मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 18 नोव्हेंबर 2015 (17:07 IST)

संजय जाधव यांचा गुरु हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येत आहे (पहा ट्रिझर)

संजय जाधव यांच्या दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तू हि रे या सिनेमांनी प्रेक्षकांना अगदी भावूक केलं. संजय जाधव यांचा सिनेमा म्हटला की काही तरी वेगळं मिळणारच हे आत्ता प्रेक्षकांनी गृहितच धरल आहे. त्यांचा आगामी सिनेमा गुरु हा भावनिक जगाकडून वास्तवतेकडे नेणारा असा आहे. 
 
अंकुश चौधरी आणि उर्मिला कानेटकर या दोघांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात असणार आहेत. गुरु ठाकूर यांच्या शब्दांची तर अमितराज आणि पंकज पडघन यांच्या सुरेल संगीताची जादू आपल्याला याही सिनेमात ऐकायला मिळणार आहे. सिनेमाच्या कथेबाबत सध्या तरी गुप्तता पाळण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणा-या 'गुरु' सिनेमाच्या नावावरूनचं त्याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.