बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By वेबदुनिया|
Last Modified शुक्रवार, 8 जुलै 2011 (17:29 IST)

अभिनेत्री रसिका जोशी यांचे निधन

PTI
चतुरस्त्र अभिनेत्री रसिका जोशी यांचे गुरुवारी रात्री गोरेगावातील नर्सिंग होममध्ये कॅन्सरने निधन झाले. त्या ३९ वर्षाच्या होत्या. त्यांच्यामागे त्यांचे पती लेखक-दिग्दर्शक गिरीश जोशी आहेत. काही दिवसांपूर्वीचं व्हाईट लिली आणि नाइट रायडर या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्या रुग्णालयात दाखल झाले होते.

रसिका जोशी यांचा मराठी नाटक, सिनेमा आणि हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये भूमिका गाजल्या. अलीकडे त्यांचे व्हाईट लिली नाईट राईडर हे नाटक लोकप्रिय ठरले होते. या नाटकाला अनेक पुरस्कारही लाभले होते.