इम्रान हाश्मी अशोक खरातची भूमिका साकारणार? नाशिकच्या भोंदू बाबावर बनत असलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार अशी चर्चा
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर बनत असलेल्या चित्रपटात इम्रान हाश्मी मुख्य भूमिका साकारू शकतो अशी माहिती समोर आली आहे. तसेच दिग्दर्शक स्वरूप सावंत अशोक खरातची आता संपूर्ण घटना रुपेरी पडद्यावर जिवंत करणार आहे.
'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स' नावाचा हा चित्रपट, हॉलीवूडमधील त्या कुप्रसिद्ध प्रकरणावर आधारित आहे. धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली एका भोंदूने आपल्या वासनेसाठी महिलांना कसे आपले भक्ष्य बनवले, हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, कोणता बॉलिवूड अभिनेता पडद्यावर या घृणास्पद खलनायकाची भूमिका साकारणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. सूत्रांनुसार, दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी या आव्हानात्मक आणि गडद भूमिकेसाठी इम्रान हाश्मीशी संपर्क साधला असून, त्याने पटकथेचे खूप कौतुक केले आहे. तथापि, अभिनेता इम्रान हाश्मीने ही भूमिका स्वीकारल्याबद्दल किंवा चित्रपटात सहभागी होण्याबद्दल कोणतेही अधिकृत विधान किंवा पुष्टी केलेली नाही.
तसेच चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे मराठी अभिनेत्री दिपाली सय्यदची निवड. दीपाली सय्यद यांनी स्वतः माध्यमांना दुजोरा दिला आहे की त्या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हा चित्रपट समाजात प्रचलित असलेल्या ढोंगीपणा आणि अंधश्रद्धेवर एक सडेतोड हल्ला असेल. मात्र, ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील भूमिका स्वीकारल्यानंतर दीपाली सय्यद यांना अज्ञात गटांकडून गंभीर आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे.
Edited By- Dhanashri Naik

